चंद्रपूर जिल्ह्यात कार्यालयीन स्वच्छता अभियान राबवा :- विवेक जॉन्सन… — जिल्हात दोन दिवस राबविणार कार्यालयीन स्वच्छता अभियान… — सर्व अधिकारी,कर्मचारी होणार सहभागी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

         चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय, कार्यालयातील शौचालय, मुतारी व कार्यालयीन परिसर हा नियमित स्वच्छ राहावा .यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याचे आव्हान चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

         चंद्र्पुर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी दोन दिवशी कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यालयात अभियान राबविण्यात येणार आहे. कार्यालयीन स्वच्छता अभियान किमान दोन दिवस राबविण्यात यावे.

          या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालयांची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. तालुका पातळीवरील व गाव पातळीवरील सर्व प्रकारच्या कार्यालयामधून कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गाव पातळीवर शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र ही कार्यालय प्रामुख्याने स्वच्छ करण्यात येणार आहे. कार्यालयातील शौचालय ,मुतारी व कार्यालयाचा आजूबाजूचा परिसर हा लोकसहभागातून श्रमदानातून स्वच्छ करण्यात येणार आहे.

         सदर अभियान बाबतचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. या अभियानात सर्व कार्यालयीन कर्मचारी , अधिकारी यांनी सहभागी होऊन दोन दिवसाचे कार्यालयीन स्वच्छता अभियान चंद्रपुर जिल्ह्यात यशस्वी करावे. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.