
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथे कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिर पार पडले १२ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अश्विन आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग सप्ताह दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सकाळी ९ ते १२.३० प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
३० वर्षावरील सर्व रुग्णांना प्रामुख्याने आढळणाऱ्या मुख कर्करोग तपासणी दंत शल्य चिकित्सक डॉ. राजेश शेंडे यांनी श ६२ रुग्णांची तपासणी केली असता १ रुग्ण मुख कर्करोग संशित असल्याचे आले.
तसेच आढळून स्तन कर्करोग व गर्भाशयात कर्करोग तपासणी डॉ.अश्विनी पिसे यांनी केली याकरिता इतर कर्मचारी सुषमा लोनबळे(अधिपरिचारिका),शरिका शेख भक्ती वेरुळकर,प्रिती बोदलकर(अ.प.) यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रम डॉ. महेश मंगर (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी),डॉ.वैष्णवी कामडी (वैद्यकीय अधिकारी नेरी),डॉ.मनोज तेलमासरे(वैद्यकीय अधिकारी),पत्तीवार,अजनी(एल. एच. व्ही.),मडावी(एच.ए.),हेमके,पारशिवे (ए.एन.एम.) यांनी सुव्यवस्थापन करून मोलाचे सहकार्य केले.