
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथील वाय एस पवार कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवशीय युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन दि १५ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी १० वाजता होणार असून अध्यक्षस्थानी राजकमल चवरे सचिव उपकार शिक्षण संस्था नागपूर हे राहणार तर उद्घाटक म्हणून अल्का कांबळे अध्यक्ष उपकार शिक्षण संस्था नागपूर,मुख्य अतिथी म्हणून डॉ.अश्विन चंदेल प्राचार्य आर एस टी कॉलेज चिमूर,दिप्ती मरकार उपनिरीक्षक पोलिस स्टेशन चिमूर,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मुकुल चवरे उपाध्यक्ष उपकार शिक्षण संस्था नागपूर,अंजु चवरे कोषाध्यक्ष उपकार शिक्षण संस्था नागपूर,मंजुषा अस्कारपूरे सदस्या उपकार शिक्षण संस्था नागपूर,इंजी सुरेश अस्कारपूरे नागपूर,केवल मेश्राम संस्था सचीव प्रगती विद्यालय नांद,एड प्रकाश नवलकर नागपूर,रजनी बावनकुळे नागपूर,ईश्वर रंदये प्राचार्य लोक कनिष्ठ महाविद्यालय नेरी,इंदल नागपूर प्राचार्य प्रशांत कनिष्ठ महाविद्यालय काजळसर, हे उपस्थीत राहणार आहेत.
दि.१६ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होणार असुन दुपारी २ वाजता हिमांशू आर्केस्ट्रा नागपूर यांचा कार्यक्रम होणार आहे.
समारोपीय व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजकमल चवरे हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून अल्का कांबळे,डॉ.मुकुल चवरे,अंजु चवरे, प्रा डॉ.हरेश गजभिये चिमूर,प्रा डॉ.नथ्थु गिरडे भिसी,प्राचार्य अर्चना डोंगरे सरस्वती कन्या विद्यालय नेरी,एड ज्ञानेश्वर नागदेवते,नेरी हे उपस्थीत राहणार आहेत.
या युवा सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ नेरी व परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन वाय एस पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य धम्मदिप वैद्य व प्राध्यापक व्रुंद यांनी केले आहे.