
ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज :- स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज, चे विशेष श्रम संस्कार शिबीर, व विद्यार्थी विकास शिबिराचे उद्घाटन, आरमोरी विधानसभा क्षेत्राची आमदार रामदास मसराम यांच्या शुभ हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश ढोरे मुख्याध्यापक जि. प. उच्च प्राथमिक शाळा कोढांळा, संस्थापक,संस्था सचिव रोशन जांभुळकर, वैशाली टेंभूरकर, अध्यक्षतेखाली अ. शि. सं. दिघोरी (ना.) परसराम टिकले, माजी सभापती प. स. देसाईगंज, मारोती जांभुळकर संस्थापक,डॉ. अनिल थुल, प्राचार्य अ. स. म. देसाईगंज, अपर्णा नितिन राऊत, सरपंच ग्रा. प. कोंढाला, नितीन राऊत माजी उपसभापती,प.स.देसाईगंज,आरती लहरी, सुनिल पारधी, शाळा शिक्षण समीती कोंढाळा, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारोह पार पडला.
विद्यार्थी, श्रमसंस्काराच्या माध्यमातूनच स्वतःच्या विकासासाठी विविध प्रकारची प्रकारचे धडे घेऊन सोबतच गावातील लोकांना श्रमाचे संस्कार दिले पाहीजे. सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असा संदेश शिबिरार्थीना दिला. शाळेतील आव्हारात शाळेत वृक्षरोपन आमदार मसराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सुनिल पारधी,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समीती कोंढाळा, प्रा. डॉ. संजय बाळबुद्धे, डॉ. डी. टी. गजभिये, कार्यक्रम अधिकारी, प्रा. राजेंद्र वालदे, कार्यक्रम मुल्यांकन आणि सांस्कृतिक नियोजन,डॉ.रेखा झलके, महेन्द्र हरीणखेडे, नरेश वैद्य, ज्ञानेश्वर टेंभुर्णे प्रा. श्रींकात धोटे,परमांनद बागडे, राजू सोनकुसरे,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला, एम. एस. डब्ल्यू. व बी. एस. डब्ल्यू विद्यार्थी सहकार्य केले. गावातील गावकरी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र वालदे, यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. रेखा झलके यांनी मानले.