
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधि पारशिवणी
कन्हान : – शहरातील शहिद प्रकाश देशमुख यांचा शहिद दिवसा निमित्य अधिका-यानी आणि नागरिकां नी शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला आणि स्मारकावर पुष्प चक्र अर्पित करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिनांक ११ फेब्रुवारी १९९९ वर्षी जम्मु काश्मीर च्या डोडा जिल्ह्यात झालेल्या आंतकवादी हल्ल्यात कन्हान शहराचा सुपुत्र प्रकश देशमुख हा शहिद झाला होता.
रविवार (दि.११) फेब्रुवारी ला या घटनेला २४ वर्ष पुर्ण झाल्याने ले. कर्नल तोमन, कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील आणि नागरिकांनी देशमुख यांचा निवासस्थानी व शहिद चौक येथे शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला आणि स्मारकावर पुष्पहार, पुष्प चक्र अर्पित करुन श्रद्धांजली अर्पण केली. तदंतर देशमुख यांचा निवासस्थानी भजन कीर्तन कार्यक्रम करुन सायंकाळी स्नेह भोजना सह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.