पारशिवनी भाजपा शहर अध्यक्षपदी रूपाली व महामंत्री म्हणून कविता यांची नियुक्ती..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

पारशिवनी::- पारशिवनी येथे मंगलवारी दिनांक 13 फरवरीला तकीया मारोती देवस्थान सभागृह येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे महीला मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.या प्रसंगी पारशिवनी शहरात भारतिय जनता पार्टीच्या पारशिवनी शहर अध्यक्ष पदासाठी सौ.रुपाली गणेश फाले यांची तर सौ.कविता अतुल पनवेलकर यांची पारशिवनी शहर महामंत्री महिला आघाडीपदी यांची नेमणूक करण्यात आली.

           प्रमुख उपस्थिती श्री.मल्लिकार्जुन डी.रेड्डी माजी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र,सौ.अनुराधा आमीन नागपुर जिल्हा अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत पारशिवनी शहर महीला अध्यक्ष करिता सौ रुपाली गणेश फाले तसेच पारशिवनी शहर महिला आघाडीच्या महामंत्री पदी,जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार याचे हस्ते नियुक्ती करण्यात आली.

        पाराशीवनी शहर महीला भाजपा आघाडी अध्यक्ष व महामंत्री पदी नियुक्ती बदल तालुका महीला आघाडी अध्यक्ष डॉक्टर माधुरी बावनकुळे,जिल्हा अध्यक्ष सौ.अनुराधा अमिन माजी आमदार डि.एम.रेड्डी, तसेच तालुका व शहरातील महीला संगठनच्या महीलांनी नियुक्ती बदल अभिनंदन केले.