
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी विलासराव तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ‘ ज्ञानविलास आचार्य श्री पुरस्कार’ शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज देवराम थोरात यांना जाहीर झाला. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
पुरस्काराचे यंदा तेरावे वर्ष आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता ओतूर येथील नंदलाल लॉन्स येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे व सचिव वैभव तांबे यांनी दिली.