कमलसिंह यादव

  प्रतिनिधी

 

      कन्हान – जम्मु कश्मीर च्या पुलवामा हल्ल्याला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता . या हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले होते . या पुलवामा हल्ल्याला चार वर्ष पूर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

 

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित लीलाबाई देशमुख यांच्या हस्ते शहिद स्मारका वर आणि शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारका वर आणि शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन “शहिद जवान अमर रहे…..अमर रहे , च्या जयघोष करण्यात आला . त्यानंतर दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिद प्रकाश देशमुख आणि पुलवामा हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .

 

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , प्रदीप देशमुख , लीलाबाई देशमुख , युवराज साकोरे , योगराज आकरे , राजेश पोटभरे , सुरज वरखडे , महेंद्र साबरे

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com