दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत
७८२२०८२२१६
आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली अंतर्गत नववे मासिक हवन कार्य निमित्याने श्री योगाजी भोयर यांचे निवासस्थाने चर्चा बैठक दिनांक 12- 2 – 2022 रोज रविवारला चर्चा बैठक संपन्न झाली.
सदर चर्चा बैठकी ही व्यसनमुक्ती हुंडाबळी अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीभ्रूणहत्या आदी विषयावर चालली चर्चा बैठकीचे अध्यक्षस्थानी दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गोविंदरावजी दोनडकर मार्गदर्शक वडसा फाल्गुनजी मानकर मार्गदर्शक कुरखेडा रवींद्र कांबळे मार्गदर्शक चुरमुरा विठ्ठलजी राऊत मार्गदर्शक आरमोरी गुंववतजी फटे मार्गदर्शक विकासनगर ,रूपालीताई शडमाके पोलीस पाटील विहीरगाव ,दूधरामजी सहारे वनरक्षक विहीरगाव सुलतान बेग बाबुसाहेब विहीरगाव दामिनी पोटे ग्रामपंचायत सदस्य विहीरगाव रामदासजी गावडे ग्रामपंचायत सदस्य विहीरगाव ईश्वर जी ठाकरे गिरीधरजी लांजेवार, रुद्रम पाटील गायकवाड, प्रकाश मेश्राम दिनेश बनकर पत्रकार दखल न्यूज प्रल्हादजी पिपरे, रामभाऊ पिंपळकर, सुभाष निकोडे ,अलकाताई पिपरे ,शकुंतलाबाई डोंगरे ,आरती दहीकर , दादाजी भोयर विहिरगाव वनमाळी डोंगरवार मार्गदर्शक तळेगाव आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित होती चर्चा बैठकीचा समारोप मानव धर्माच्या सायंकाळचे प्रार्थनेने करण्यात आला.
चर्चा बैठकीला परिसरातील हजारो सेवक सेविका यांची उपस्थिती होती चर्चा बैठकीचे प्रास्ताविक गिरधरजि लांजेवार यांनी केले तर संचालन कविवर्य माणिक मेश्राम यांनी केले तर चर्चा बैठकीचे आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे मार्गदर्शक चुरमुरा यांनी मांनले.