दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं. १३ फेब्रुषवारी २०२३
चामोर्शी:-खासदार अशोकजी नेते हे चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे शिवलींग अभिषेक व महाकाला, होम हवन या सोहळया निमित्ताने आले असता कढोलीचे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते स्व.भैयाजी वाकुडकर हे इसम दीर्घशा आजाराने मृत्यू पावले या संदर्भित माहिती प्रदेश सदस्य श्री. स्वप्निलजी वरघंटे यांनी दिली असता या संबंधित तात्काळ दखल घेत खासदार अशोकजी नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबाला
दिं १२ फेब्रुवारी २०२३ ला कढोली या ठिकाणी आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश जी गेडाम, प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, नगरसेवक आशिष पिपरे, माजी जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार,भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते संजयजी पंदिलवार,सरपंच जितेंद्र हुलके,उपसरपंच रामचंद्र बामनकर, किसान आघाडी चे ता.अध्यक्ष रामदास हुलके, माजी. तंटा.मु.अध्यक्ष ललित पा.ईजमनकार, ग्रा.प.सदस्य दिवाकर भोयर,आनंदराव भोयर,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.