बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर
****
— इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील,इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,यांच्यासह पुणे येथील बॉम्ब पथकाची घटना स्थळाला तात्काळ भेट..
— नागरिकांनी सावधगिरीने राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना…
— बॉम्ब सदृश्य वस्तू पाहुन लोक वस्ती पासून 200 ते 300 फुठ आंतरावर वस्तू जमिनीत खड्डा घेऊन पुरण्यात आली.
— आज सकाळी प्रशासन याचा छडा लावणार…
****
निरा नरसिंहपुर :-
इंदापूर तालुक्यातील मौजे टणु गावा नजीक हर हर महादेव एसटी स्टॉप जवळील मोहिते वस्ती येथील दत्तात्रेय तुळशीराम मोहिते यांच्या जनावराच्या गोठ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने तेथील स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले असून संबंधित मालकाने तात्काळ इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
दिलीप पवार, बावडा आऊट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना खबर दिली.
संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून घटनास्थळी तात्काळ भेट दिली. तसेच पुणे येथील बॉम्ब पथकाला पाच्यारण करण्यात आले. सदरची बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक शोधक पथकाने पाहिल्याने सदरची संशयास्पद वस्तू हिचा अंदाज रात्रीच्या वेळेस न आल्याने बॉम्बशोधक पथकाने सदरची संशयापद वस्तू पाहून
अंदाजे दोनशे ते तीनशे फूट अंतरावर खड्डा खालून बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आसल्याची माहिती सूत्राने दिली.
सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान इंदापूर तालुक्यातील मौजे टणु गावानजीक मोहिते वस्ती येथील
शेतकरी दत्तात्रेय तुळशीराम मोहिते यांच्या जनावरच्या गोठ्यामध्ये सदरची संशयास्पद वस्तू आढळून आली.सदर संशयस्पद वस्तू बाबत गोठा मालकास संशय आल्याने गोठा मालकाने प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पाटील पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना तात्काळ खबर दिली.
सदर अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळाला भेट दिली व पुणे येथील बॉम्बशोधक पथकाला पाच्यारण करण्यात आले.
तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पुणे येथील बॉम्बस्फथक सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी याचा तपास लावण्यासाठी सक्रिय झाले आहेत.