जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही अशा अर्जदारांकरीता जिल्हयात विशेष कृती कार्यक्रमाचे आयोजन…

ऋषी सहारे 

   संपादक 

गडचिरोली :- सन 2024-25 या सत्रामध्ये शैक्षणिक, सेवा, निवडणुक व इतर प्रयोजनातील प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती, गडचिरोली या कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल केलेल्या अर्जदारांना अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या सर्व अर्जदारांकरीता जिल्हयात विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येत असून समिती कार्यालयात चौकशी कक्षामध्ये विशेष श्रृटी पुर्तता मोहीम कक्ष तयार करण्यात आले आहे.

         अर्जदार विद्यार्थ्यांना या आधी समितीकडून पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या त्रुटीची पुर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती, तसेच जाती दावा सिध्द करण्याऱ्या महसुली, तसेच शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहून, आपल्या प्रकरणाची त्रुटीची पुर्तता करावी याबाबत कळविण्यात येवून त्रुटीची पुर्तता करण्यात आले. तसेच त्रुटीची पुर्तता केलेल्या प्रकरणावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले आहे. परंतु अर्जदाराने नृटीची पुर्तता न केलेले प्रकरणे प्रलंबित आहेत.

        अशा सर्व अर्जदारांनी दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी त्रुटींची पुर्तता करण्यासाठी “विशेष कृती कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व दस्ताऐवजाच्या छायांकित व मुळ प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.