
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
प. पू. श्री संत मुर्लीधर महाराज यांच्यासह श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुर्कंडेश्वर पंचकमेटी देवस्थान देवटोक (सीर्सी) चे सर्व पदाधिकारी व भाविकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात मकर संक्रात निमित्त गंगा स्नान केला.
१४ जानेवारी रोज मंगळवारला मकरसंक्रांती तथा महाकुंभ निमित्त उत्तर वाहिनी वैनगंगा नदी वर गंगा स्नान प. पू. संत मूर्लीधर महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सकाळी ०६ वाजता पासून दुपारी ०३ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आला होता.
वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनी स्थळी श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर पंचकोटी देवस्थान देवटोक (सिर्सी) या ठिकाणी सर्व भक्ताच्या उपस्थितीत स्नान करण्यात आले.
त्यावेळी प. पू. संत मूर्लीधर महाराज व श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर पंच्कोटी देवस्थान देव टोक शिर्शी ट्रस्टचे सचिव नरेंद्र जक्कुलवार, हरणघाट देवंस्थाचे उपाध्यक्ष लच्यया गदेवार, मूर्लीधर महाराज यांचे स्वयंसेवक सुधीर गुरणुले, राकेश गोलेपलीवार, देवानंद हजारे, उमेश पिटाले, राजेंद्र गडपल्लीवार, महेश चुदरी, स्वप्निल ठाकुर,मारोती उमलवारं, निलकंठ फाले, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.