राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यासाठी तपोभूमीत उसळला गुरुदेवभक्तांचा जनसागर..

          रामदास ठुसे

नागपुर विभागीय विशेष प्रतिनिधी 

           विदर्भाची पंढरी समजली जाणारी वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शनि पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा येथे 65 व्या गुंफा गोंदेडा यात्रा महोत्सवाला 9 जाने पासून सुरवात झाली अनेक कार्यक्रमाच्या आयोजनात मोठ्या उत्साहात दि.13 जाने ला कीर्तन गोपाळकाला व मान्यवरांच्या मार्गदर्शन कार्यक्रमानी महाप्रसादाचा वितरण करून यात्रा महोत्सवाची सांगता झाली.

              या पाच दिवसीय गुंफा महोत्सवात तपोभूमी गुरुदेव भक्तांना दर्शन देण्यासाठी सजली होती. लाखो भक्तांनी वंदनीय महाराजांच्या तपोभूमीचे दर्शन घेतले तसेच गोपाळकाल्या ला गुरुदेवभक्त भाविकांचा जनसागर उसळला होता.

                वंदनीय राष्ट्रसंताच्या तपोभूमीत दि. 13 जाने ला सकाळी ग्रामसफाई करून नियमितपने कार्यक्रमाला सुरवात करीत गावातून रामधून व पालखी मिरवणूक काढण्यात आली.

           यावर महादेव पिसे यांनी विचार प्रगटन केले यानंतर ध्वजारोहण गुंफा पात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले.

            लगेच पालखी सोहळा आयोजित करून मिथुन गुरनुले अध्यक्ष गुंफा यात्रा समिती एकनाथ बोरकर वागन बोरकर विनोद हटवाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पात 70 पालख्यानी भाग घेतला होता यानंतर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

                  शेकडों दात्यांनी रक्तदात्यांनी केले लगेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर तथा मोफत औषधी शिबीर घेण्यात आले. यात हजारो रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला हा शिबीर गिरीश भोपे यांच्या आयोजनात घेण्यात आला. स्वरगुरुकुंजाचे कार्यक्रम गुरुकुंज आश्रम गोझरी अमोल बांबल यांनी आयोजित केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

             यानंतर लगेच गोपाळकाला संकीर्तन हभप लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर गुंफा यात्रा महोत्सव समिती अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यात दिवाकर निलंकठ भोपळे ईश्वर चिड्डीने यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष न्हणून मंगला डांगे गोंदेडा यांची निवड झाली लगेच मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात माला.

             या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी जनार्धन बोथे दादा सरचिटणीस गुरुकुज मोझरी रुपलाल कावळे बौकेदादा वरखेड राजू देवतळे आजीवन सदस्य केंद्रीय कार्यकारिणी मान्यवर म्हणून उपस्थित होते.

           यांनी महाराजांचे कार्य आणि जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तर काहींनी ग्रामगितेचे विचार सांगून मार्गदर्शन केले तर हभप काळे महाराज यांनी कीर्तनातून समाजाला जागृत करण्यासाठी महाराजांचे विचार सांगितले तर प्रमुख उपस्थिती मिथुन गुरनुले अध्यक्ष यात्रा महोत्सव समिती, प्रवीण मोतीराम वाघे, गिरजबाई गायकवाड, सरपंच विठ्ठलराव सावरकर, अध्यक्ष जीतूभाऊ होले,यावली साबळे महाराज, श्यामजी हटवादे, राम राऊत सर, शेखर यादव,नत्थुजी भोगर,प्रा. भास्कर वाढई, प्रा.राम राऊत, ग्रामगीताचार्य घनश्याम चाफले,गिरीश भोपे,अनिल गुरनुले, वसंता घोडाम,भरत जांभुळे,प्रशांत आदनसरे, पांडुरंग अडसोळे, विनोद हटवादे,भोजराज कामडी, रत्नमाला सोनूले, राजू झाडे तालुका अध्यक्ष भाजपा, विठ्ठल वाढई,सुधाकर चौधरी, विलास कोराम, महेश गिरडकर,विठ्ठल जांभुळे,भोजराज कामडी, दिलीप खोब्रागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

            मंचावरील प्रमुख गान्यवरांचे शाल श्रीफळ आणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणा-या सेवकांची सुद्धा सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सावरकर संचालन भात्कर वाढई आभार लॉनबले सर यांनी मानले. यानंतर गोपालकाला हभप काळे महाराज यांच्या हस्ते होऊन राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.