
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन तिकडे वळताना दिसत असून पुढील आयुष्य चांगले जगण्याचा दृष्टिकोनातून व्यसनमुक्ती राहण्याचा संकल्प राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांनी घ्यावा असे आवाहन सावली पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी केले.
ते बोलताना पुढे म्हणाले की सुदृढ व बलशाली समाज निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्त राहणे हे काळाची गरज आहे त्याचप्रमाणे युवकांनी आपले आत्मबल खचून जाता अभ्यासाकडे लक्ष देऊन व आपल्या कार्याकडे लक्ष देऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी तसेच त्यांनी आपल्या नोकरी करता झालेल्या अडीअडचणी व प्रासंगिकता त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर विचार केले.
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त सावली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिन व उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावलीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे होते.यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य विजय दुपारे, स्पंदन संस्थेचे सचिव पंकज सुरमवार,माजी विद्यार्थी दिनेश मेश्राम,वृषण उरवते,गिरीश गुरुनुले मंचावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी दिनेश मेश्राम,वृषण उरवते,गिरीश गुरुनुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय दुपारे यांनी केले प्रास्ताविकातून त्यांनी महाराष्ट्र सरकार तर्फे आयोजित उद्योजकता मेळाव्याच्या संदर्भातून त्यांनी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती वर निमित्त त्यांच्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन कु.गायकवाड म्याडम यांनी केले तर आभार निखिल उमाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद प्रज्ञावर्धन,नाले,उमरे, केंद्रे,आकेवार, पाखमोडे,खरवडे यांनी परिश्रम घेतले.