मौजा हेट्टी (दाबका) येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे,झालेले संपुर्ण बांधकाम पाडणे आवश्यक! — बांधकामावर पाणी न मारणारे नवीन सिमेंट निघाले आहे काय? — ठेकेदाराचे अजब कारस्थान,अभियंता काय बघतात? — शासकीय कामातंर्गत शासनास लुटो अभियान सुरु…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          शासकीय बांधकामाच्या माध्यमातून सध्या,”शासनास लुटो अभियान सुरु असून,”शासकीय निधी अंतर्गत बांधकाम कसेही करा आणि रुपये कमवा,असे विचित्र चित्र चिमूर तालुक्यात जिकडे-तिकडे दिसून येते आहे.

          कामे कोणत्याही प्रकारची अशोत,ते काम आमदारांच्या मानसाला दिले आहे ना?किंवा आमदारांच्या मर्जीतील व्यक्ती ला,(कंत्राटदारांना) दिले आहे ना?”मग!करा त्या बांधकामाकडे दुर्लक्ष असा बेशिस्तीचा बिनधास्त प्रकार चिमूर विधानसभा मतदारसंघात आवर्जून सुरू आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत मौजा हेट्टी (दाबका) गाव आहे.या गावात सभागृहाचे बांधकाम सुरु असून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या निधी अंतर्गत सदर सभागृहाचे बांधकाम असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

          सभागृह बांधकामाला ४० लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे गावकरी सांगत असले तरी नेमका किती निधी सभागृहाचे बांधकामांसाठी मंजूर आहे हे दर्शनीय स्थळी कामचा फलक ठेकेदारांनी आणि संबंधित बांधकाम विभागांनी लावला नसल्याने सांगता येत नाही.

         कुठल्याही बांधकामाचा दर्शनीय फलक काम सुरू होण्यापूर्वी,”बांधकाम विभाग किंवा कंत्राटदार जाणिवपूर्वक लावत नाही,हा एक त्यांच्या कृतीतील भ्रष्टाचाराचाच भाग स्पष्ट दिसतो आहे.

     मौजा हेट्टी (दाबका) येथील सभागृहाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर सभागृहाच्या पायवा बांधकामांवर मजबूतीसाठी अजिबात पाणी टाकण्यात आले नाही.

      तद्वतच सदर सभागृहाचे स्लाॅब टाकून झाल्यावर सुध्दा १० दिवस स्लाॅब ला पाणी देण्यात देण्यात आले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

        महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्री.सुधाकर किन्नाके यांनी व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी,”दखल न्यूज भारत,ला दिलेल्या मुलाखतीत,सभागृहाचे बांधकामाबाबत सविस्तर माहिती दिली.

         सभागृह बांधकामांच्या ठेकेदारांनी सभागृहाचे पायवा व स्लाॅब वर नियमानुसार पाणी टाकले नसेल तर सभागृहाचे बांधकाम मजबूत कसे काय होणार?हा प्रश्न आहे.म्हणूनच सभागृहाचे सर्व बांधकाम पाडणे गरजेचे आहे आणि सभागृहाचे दुसरे बांधकाम करणे तितकेच महत्वाचे आहे.

          याचबरोबर सभागृहाचे ठेकेदार,सभागृहाचे बांधकाम बरोबर करीत नसताना संबंधित देखरेख अभियंता डोळेझाकून बिले काढीत आहेत काय? आणि डोळे झाकून बिले काढणार आहेत काय? हेच कळायला मार्ग नाही…

           मौजा हेट्टी (दाबका) येथील सभागृहाचे बांधकामांकडे संबंधित अभियंता का म्हणून दुर्लक्ष करतात? याबाबत त्यांचे कर्तव्य पुढे येणे आवश्यक आहे.

            (मौजा हेट्टी) ग्रामीण भागातील सभागृहाचे बांधकाम कशाही प्रकारे करुन रुपयांची उचल करणे असा उद्देश ठेकेदाराचा आणि संबंधित बांधकाम विभागाचा असेल तर बांधकाम न करताही रुपयांची उचल केलेली बरे नाही का?

          याचबरोबर सभागृहाचे पायव्यावर आणि स्लाॅब वर बांधकाम मजबूत करण्यासाठी (पकन्यासाठी) नियमानुसार पाणी टाकले जात नसेल तर नवीन सिमेंट निघाले आहे काय? बांधकामाला अनुसरून पाणी न वापरणारे?