संस्कृत भाषेचे रक्षन व संवर्धन आवश्यक आहे :- मारुती महाराज कुऱ्हेकर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : “संस्कृतभाषा देवभाषा आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे.” असे उद्गार संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र संमेलनाचे अध्यक्ष मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी काढले. 

        मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी ग्रंथ ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा या ग्रथांच्या अध्ययनासाठी संस्कृत भाषेचे महत्त्वही लक्षात आणून दिले. पूर्णतः संस्कृत भाषेतून या संमेलनात व्यवहार चालत होते. प्रमुख वक्ते संस्कृत भारतीचे अ.भा. गीता शिक्षण प्रमुख शिरीष भेडसगावकर म्हणाले,”संस्कृत भाषेच्या अभ्यासाने मराठी व भारतातील प्रादेशिक भाषा समृद्ध होत असतात. नवीन शब्द निर्माण करण्यासाठी संस्कृत भाषेचे सहाय घ्यावे असे आपल्या संविधानात म्हंटले आहे. भारतीय ज्ञानपरंपरा मुख्यत: संस्कृत भाषेत आहे. ते ज्ञान आज उपलब्ध होण्यासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यक आहे.

            संस्कृती रक्षण व त्यासाठी संस्कृत शिक्षण या कार्याचे उत्तरदायित्व हे प्रत्येकाने स्वतःच्या खांद्यावर घेण्याची आज गरज आहे,असे संस्कृत भारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतअध्यक्ष निवृत्त कर्नल सतीश परांजपे यांनी यावेळी सांगितले.

          यावेळी हभप मारोती बाबा कुर्हेकर, डॉ.माणिक शास्त्री, अशोक शास्त्री, डॉ.चिदंबर महाराज साखरे, भास्कर महाराज शिंदे, राजाभाऊ चोपदार, रविदास शिरसाट, बाजीराव नाना चंदीले व अन्य मान्यवर उपस्तित होते. स्वामी विवेकानंद जयंती व राजमता जिजाऊ मा साहेब जयंती तसेच पुण्य श्लोक अहिल्यादेवी यांचे 300 वी जयंती वर्ष या निमित्त शोभा यात्रा चे माध्यमातून मानवंदना देणेत आली. यावेळी आळंदी गावात ‘जयतु संस्कृतं जयतु भारतं’ अशा घोषणा देत शोभायात्रा काढण्यात आली.