कुरुड येथे मोफत रोगनिदान आरोग्य शिबिरामधे घेतला १०१२ रुग्णांनी लाभ…

राकेश चव्हाण

   प्रतिनिधि

दखल न्यूज़ भारत 

            श्युअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लीं.कार्डिओलॉजी, पॉलीट्रॉमा, सुपर स्पेशालिस्ट युनिट जामठा आणि मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश व ग्रामपंचायत कुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर दिनांक१३ रोज शनिवारला मौजा कुरुड येथे श्री संत गजानन महाराज देवस्थान पाटील पुरा या स्थळी शिबिराचे आयोजन केलं होतं.

          या शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेंद्रभाऊ चंदेल ऊबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश, कार्यक्रमाचे विशेष अतिथी गावच्या प्रथम नागरिक सौ.प्रशाला ताई गेडाम,कोंढाळा गावचे प्रथम नागरिक सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच क्षितीज भाऊ उके, ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, मनोहर पाटील पोरेटी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, वामनराव सावसाकडे किसान काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष, सर्वश्री दिगंबर मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य, अविनाश गेडाम ग्रामपंचायत सदस्य, महादेवजी ढोरे तंटामुक्त समिती अध्यक्ष, नंदू भाऊ चावला तालुकाप्रमुख देसाईगंज, विलास गोटेफोडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी गडचिरोली, विजय कुंभलवार, दूशांत वाटघुरे सेवा दल तालुका अध्यक्ष,सौ पुष्पाताई कोहपरे तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, श्रीमती आरती लहरी, रजनीताई आत्राम उपस्थित होते.

           श्युअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ली. युनिट जामठा (नागपूर) यांच्या वतीने शिबिर स्थळी १०१२ रुग्णांनी नोंदणी करून आरोग्याची तपासणी करण्यात आली, त्या रुग्णांमधून गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना नागपूर येथील शूवरटेक हॉस्पिटल येथे मोफत उपचार मिळणार आहे.

          याप्रसंगी डॉ.अनुप पुसाटे,डॉ.उर्मिला ढानके, डॉ.तनय नाहाटकर , डॉ.वीरेंद्रसिंह बावा,डॉ.निलेश वाडीभस्मे, डॉ.वैष्णवी ओझा, डॉ.कांचन चांडक, डॉ.मोनीषा पडवेकर,श्री प्रसाद पांडे,श्री मोहन लोहबरे,आरोग्य सेविका सेवक पायल मोहाडीकर,गोपिका कोबे,मिलिंद मेश्राम,रवी डोकंरमारे,आणि शूअरटेक परिवार हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी रुंद यांनी योग्यप्रकारे मार्गदर्शन करत औषधी, इसीजी, ब्लड तपासणी, शुगर तपासणी, हड्डी तपासणी, हृदयरोग तपासणी, मधुमेह तपासणी इतर सर्व आजारांची चिकित्सा करून रुग्णांना मोफत सेवा दिली.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश,अविनाश भाऊ गेडाम,संतोष पारवेकर,विजय कुंभलवार, राम बुराडे, खुशाल राऊत,बंडू देशमुख, सुखदेव ठाकरे, अशोक कुथे, सुरज चौधरी, संपत बेदरे, महालक्ष्मी कॅटर्स चे सर्व कर्मचारी व संपूर्ण मित्रपरिवार यांनी विशेष सहकार्य केले.