दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले संतभुमी अलंकापुरी नगरीत ‘एक दिवस धर्माच्या रक्षणासाठी’ विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
अलंकापुरी नगरीत गेल्या काही दिवसांपुर्वी हिंदू समाजातील नागरिकांचे धर्मांतर ख्रिश्चन मिशनरी करत असताना उघड झाले आहे भविष्यात संतभुमी अलंकापुरी नगरी एखादी व्हॅटिकन सिटी म्हणून उभी राहिला वेळ लागणार नाही ही धर्मांतराची कीड रोखण्यासाठी हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात धर्मांतर बंदीचा कायदा लागू झाला पाहिजे आणि हा कायदा व्हावा हे समाजातील सर्व घटकांना वाटत आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी ती हाक सरकारच्या कानावर घालण्यासाठी संतभूमी अलंकापुरी नगरीत विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, सदर हिंदू जनजागरण मोर्च्याची सुरुवात चाकन रोड वरील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था येथून सुरुवात झाली, सदर विराट मोर्चा ज्ञानेश्वर विद्यालय रोड वरून चाकण चौक, मनकर्णिका चौक, प्रदक्षिणा रोड, भैरवनाथ चौक, पाण्याची टाकी, कॉसमॉस बँक, पोलीस स्टेशन, नगरपरिषद चौक मार्ग महाद्वार चौकात सदर मोर्च्याची सांगता झाली.
यावेळी आळंदी शहरातील वारकरी शिक्षण घेणाऱ्या साधक आणि हभप महाराज मंडळींची लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली मोर्चा मध्ये आळंदी आणि पंचक्रोशीतील तरुण वर्ग, महिला वर्ग, सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हिंदू जनगर्जना मोर्चात यावेळी जय श्रीराम, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन हिंदु धर्म कि जय, भारतमाता की जय, आळंदी चे पावित्र्य राखलेच पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे…! अशा घोषणा देण्यात आल्या. सदर हिंदू जनजागरण मोर्च्याची सांगता विराट सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन करून पसायदानाने करुन सांगता झाली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत विशेष पोलीस बंदोबस्त यावेळी आळंदी मध्ये ठेवण्यात आला होता.