निरा नरसिंहपुर दिनांक :14
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
मार्डी तालुका मान येथील कर्तव्यदक्ष महिला मीनाक्षी राजेंद्र धावड यांची आबासाहेब पोळ बिगरशेती पत संस्थेच्या संचालक पदी भरघोस मताधिक्याने विजय मिळवला,,
निवडी प्रसंगी मीनाक्षी धावड बोलत आसताना म्हणाल्या की,, शिंगणापूर शिवशंभो महादेवाचा व कैलासवासी सदाशिवराव पोळ यांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन मनोज दादा पोळ यांच्या मार्गदर्शनाने व मार्डी गावच्या पंच क्रोशीतील पतसंस्था सभासद बंधू आणि भगिनींनी मतदार रुपी दिलेला आशीर्वाद पाठीशी खंबीरपणे आसल्यामुळे आपल्या पॅनलचा विजय झाला याचा मला आनंद आहे. .म्हणूनच पतसंस्थेच्या सभासदांचा कधीच विसर पडू देणार नाही. नूतन संचालक मीनाक्षी धावड यांचे निवडी प्रसंगी उद्गार.
मार्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकनेते कैलासवासी सदाशिवराव पोळ सहकारी पॅनल हा मनोज दादा पोळ यांच्या मार्गदर्शनाने पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लढवून सर्वच उमेदवार विजयी झाले.
तर संदीप पोळ यांच्या परिवर्तन पॅनलचा बारा झिरो ने धुवा उडविला व महिला प्रतिवर्गातून मीनाक्षी धावड यांचा भरघोस मतांनी दणदणीत विजय झाला.
महाराष्ट्रातील सर्व सुतार बांधवांनी निवडी बद्दल आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिला.