नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -येथील हनुमान मंदिर नवीन बस स्टॉप समोर येथे पार पडलेल्या आमसभेत भारतीय सोनार समाज शाखा साकोलीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली .यामध्ये सलग तिसऱ्यांदा व्यंकटेश येवले यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आम सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी बुधवारला दुर्गा मंदिर पंचशील वार्ड येथे हा सोहळा आयोजित करण्याचे ठरविले यात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या वेशभूषेत मिरवणूक काढण्यात येईल .स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, हळदीकुंकू, मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा तसेच समाजातील ८० वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येईल व नंतर गोपालकाला व महाप्रसाद देण्यात येईल.
कार्यकारिणी -व्यंकटेश येवले अध्यक्ष ,दिलीप निनावे उपाध्यक्ष, मयूर गजापुरे सचिव ,राजेश ढोमणे कार्याध्यक्ष ,प्रकाश रोकडे कोषाध्यक्ष, किशोर पोगडे संयोजक ,अमेय डुंभरे प्रवक्ता, मोंटू गजापुरे संपर्कप्रमुख, हरीश पोगडे प्रसिद्धीप्रमुख, अमोल हर्षे सांस्कृतिक प्रमुख , सुरेश हर्षे सुत्रसंचालक पदी निवड करण्यात आली.
महिला कार्यकारिणी -भारती गजापूरे अध्यक्ष, बबिता भजे सचिव ,रेखा गजापुरे उपाध्यक्ष, अनिता पोगडे कोषाध्यक्ष ,माधुरी ढोमणे कार्याध्यक्ष, सुरभी डुंबरे सूत्रसंचालन यांची निवड करण्यात आली.