सावली ( सुधाकर दुधे )
सावली नगरातील प्रतीष्टीत व्यापारी श्री. देवानंद वासूदेव सोनूले यांच्या मुलगा चि. आयुश याचा वाढ़दीवस महात्मा जोतीराव फुले वाचनालयास पुस्तके देऊन नुकताच साजरा करण्यात आला महात्मा जोतीराव फुले वाचनालय सावली येथे देवानंद सोनूले यांच्या मुलगा चि. आयुश याचा वाढ़दीवस वाचनालयास पुस्तके देऊन साजरा करण्यात आला चि. आयूश च्या हस्ते पुस्तके व विद्यार्थ्यांना पेन चे वाटप करण्यात आले . या वेळी श्री . देवानंद सोनूले यांनी वाचनालयातील विद्यार्थ्यांना कसल्याही अडचणी आल्यास त्या सोडवीन्यास सदैव तत्पर राहू असे मत व्यक्त केले . पुस्तकांचा स्वीकार वाचनालयाच्या वतीने श्री . प्रदिप लेनगूरे , श्री नितेश रस्से फुले स्वयमसेवक रवी वाढई , महेश मांदाळे , महेश गुरनूले, सुरज आवळे भास्कर शेंडे सर्व युवक युवती वाचनालयातील विद्यार्थी यांनी स्वीकार केला …..