रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :-
चिमूर मार्गावरील शेडेगाव येथील सीएमपीडीआय कॅम्पजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने धडक दिली.यात एकाचा जागीच मृत्यू झाला,तर एक गंभीर जखमी झाला.गंभीर जखमी झालेल्याचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृताचे नाव संजय चौखे (वय ४५ रा. भान्सुली) असे आहे.अपघाताची ही घटना तीन डिसेंबर रोजी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली होती.
आठवले समाजकार्य महाविद्यालयात रामा गायकवाड कार्यरत होते.रामा गायकवाड दुचाकीने गावातीलच संजय चौखे यांना घेऊन गावाकडे जात होते.
चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील सीएमपीडीआय
कॅम्प येथील हॉटेलजवळ एक ट्रक उभा होता.मार्गावर जाणाऱ्याना याची माहिती होण्याकरिता ट्रक चालकाने मागील लाईट सुरू न ठेवता बंद केले होते.
समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने गायकवाड यांची दुचाकी ट्रकलवर धडकली.यात रामा गायकवाड यांचा जागीत मृत्यू झाला होता.
गंभीर जखमी झालेल्या संजय चौखे यांना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला रेफर करण्यात आले.अत्यंत गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना चार डिसेंबरला चंद्रपूरवरुन नागपूरला हलविण्यात आले.
मात्र,गंभीर दुखापत व अतिरक्तस्त्राव झाल्याने आठ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर त्यांचा ११ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.