शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन :- मस्के…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :- तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्युत विभागांकडून अनेक समस्या असल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते शामराव (श्याम) रामाजी मस्के यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्यांना पाहुन देसाईगंज विद्युत विभागातील उप कार्यकारी अभियंता यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.

          विद्युत विभागाने लवकरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा श्याम मस्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे केला आहे.

           निवेदनात मस्के यांनी नमुद केले की, शेतकऱ्यांना कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन त्वरीत देण्यात यावे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामसाठी अविरत २४ तास विद्युत देण्यात यावे, तालुक्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्यांना सोलार पंप कनेक्शन मिळालेले आहेत.

         त्याअनुषंगाने जर बिगाड आल्यास त्या दुरूस्ती करीता सोलर सर्विस सेंटर आफीसची व्यवस्था जिल्हयातील प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा त्रास आहे किंवा पुर बुडीत जमीन आहे. अश्या शेतकऱ्यांना कृषी विद्युत कनेक्शन देण्यात यावे.

         ज्या शेतकऱ्यांचे कृषी विद्युत पंप कनेक्शनाचे डिमांड भरले आहे अशा शेतकऱ्यांना त्वरीत विद्युत कनेक्शन देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांकडून मागण्यांची पुर्तता करावी अशी विनंती सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली.

           निवेदन देताना रिलेश माडगे, बाजीराव गायकवाड, राघो कुंभरे, दिलीप राऊत, टिकाराम धोटे, दादाजी नाकतोडे, धनंजय नाकार्ड, लंकेश्वर नाकाडे आदी शेतकरी उपस्थित होते.