पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :-
देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश काशिराम घुटके यांना अखिल भारतीय दलीत साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप ने नुकतेच गौरविण्यात आले. दिनांक ८ व ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथील बुराडीस्थित सभागृहात अखिल भारतीय दलीत संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री संघमित्र गौतम (उत्तर प्रदेश) यांनी केले तर अध्यक्ष म्हणून डॉ. सुमनाक्षर (दिल्ली) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्रकुमार मंचावर उपस्थित होते.
रमेश घुटके वनविभागात क्षेत्रीय वनाधिकारी आहेत. शासकीय सेवा बजावत असतांनाच फावल्या वेळेत ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. ते यापुर्वी गडचिरोली – चंद्रपूर वनकर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष देखील होते.
कास्ट्राइब वनकर्मचारी संघटनेचे देखील ते अध्यक्ष आहेत. सोबतच रक्तदान शिबीर शिबिर आयोजित करणे, बेरोजगार युवक-युवतींसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, संविधानाचे महत्व समजावून सांगणे, याशिवाय अन्य समाजोपयोगी कार्य करण्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात.
या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा म्हणून त्यांना फेलोशिप ने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.