भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे चिमुर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार चिमुर यांना तक्रार निवेदन…

   शुभम गजभिये 

तालुका प्रतिनिधी चिमूर 

       चिमुर तालुक्यातील अनेक ठिकाणी अनाधिकृत अतिक्रमण करुन ढाबे – हाँटेल सुरू आहेत.पंरतु प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे,असा आरोप भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांनी केलाय.

        यांचे कारण चिमुर तालुक्यातील मौजा मासळ तुकुम आणि आता मौजा गदगाव या ठिकाणी बौद्धाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई तहसीलदार चिमुर यांनी केली.

      पंरतु चिमुर – वरोरा हायवे मार्गांवर अनाधिकृत विनापरवानगीने झुडपी जंगल म्हणून असलेल्या म्हसुल विभागाच्या शासकीय जागेवर बांधकाम सुरू आहे.

       त्यामुळे अतिक्रमण सर्व ठिकाणचे काढावे,एका विशिष्ट समाजावर अत्याचार केल्याची प्रसिद्धी करु नये.म्हणून तहसीलदार चिमुर यांना भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष व तमाम आंबेडकरी जनतेच्या वितने देण्यात तक्रार निवेदन आले.

        यावेळी त्यांनी ३ दिवसांत सदर अतिक्रमण काढावे असे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सुचित केले.अन्यथा गदगाव या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचे वाचानालय उभारण्यासाठी जागेवर कब्जा करण्याचा ईशारा जगदीश भाऊ मेश्राम यांनी दिला.

       यासोबतच त्यांनी सर्व समाजाला सांगीतले की आपण फुले – शाहु- आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतोय.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आपण चालतोय मग सर्व जाती – धर्मातील नागरीकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालावे असे समाजाला आव्हान केले.

       सोबतच नुकताच परभणी जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली.या प्रकरणात हलगर्जीपणा करत दोषींवर कारवाई करण्यात आली नाही,त्यामुळे आंबेडकरी जनतेनी तीव्र मोर्चा काढला.

       पंरतु भिम नगर या ठिकाणी परभणी पोलिसांनी कोबिंग आपरेशन करुन बौद्ध समाजाच्या घरात घुसून माराहण केली आणि अमानुषपणे मारहाण केली.

      त्यामुळे त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबिनाची मागणी उपविभागीय अधिकारी चिमुर यांना दिलेल्या निवेदनातुन राज्याचे मुख्यमंत्री यांना केली आहे.

      यावेळी लोकनाथ रामटेके,बुध्दरथत्न शेंडे,प्रितम भैसारे,आषिस बोरकर, सुरेश मेश्राम,संदिप शंभरकर, शनिदेव खोब्रागडे,अनेक आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.