सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीच्या आर्याच्या अतिक्रमणाची पुनरावृत्ती संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अर्थात 2025 मध्ये.
सर्व बहुजनहो आणि संविधाननिष्ठ, देशभक्तहो, विज्ञानवादी, विवेकवादी म्हणजेच मानवतावादी आणि विशेष म्हणजे आपापल्या कट्टर आंधळ्या धर्मापेक्षा निसर्गाला आणि मानवता धर्माला मानणाऱ्या मूलनिवासी आणि पूर्वीच्या शूद्र, अती शुद्रानो, काळाच्या ओघात वाहत जाणाऱ्यानो, जय संविधान……….
जेंव्हा निसर्गवादाच्या आणि मानवतावादाच्या मुलतत्वावर आर्याच्या ‘कुटनीतीने ‘ प्रथम घाव घालून लोकशाही मूल्यांना ( सिंधू आणि ग्रीक संस्कृतीत विसावलेल्या लोकशाही मूल्यांना ) जगाच्या वेशिवर टांगले. त्या प्रतीक्रांतीला शह देण्यासाठी प्रथम……….
सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त करुन, धम्माचे संशोधन करुन, दुःखमय जगाला बाहेर काढून, एक दुःखमुक्त सुखी जीवन जगण्याचा मध्यम मार्ग काढून प्रथमच या कुटनीतीला शह देण्यासाठी शांतीतून क्रांती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.…..
आणि हीच धम्मक्रांती याच प्रतीक्रांतीवाल्यांच्या, मनुवाद्याच्या, मानवताविरोधीवाल्यांच्या, निसर्गवादाच्या विरुद्ध असलेल्याच्या जिव्हारी लागली. कारण सुमारे 1500ते 1800 वर्षात या मनुवाद्याच्या कू संस्कृती विरोधात कुणीही दंड थोपटले नव्हते. ग्रीक आणि आपल्या देशात हजारो वर्षात इतरांना ( ब्राम्हण व्यतिरिक्त सर्वजण बहुजनवर्ग ) शारीरिक आणि मानसिक गुलाम बनविण्याच्या विरोधात एवढी मोठी वैश्विक क्रांती कुणीच केलेली नव्हती. म्हणून ही क्रांती त्यांच्या जिव्हारी लागली होती……..!
म्हणून भगवान बुद्धाच्या या क्रांतीला मुळासहित कसे उखडून टाकावे यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुद्धा अनेक प्रयत्न झाले. मात्र ते सपशेल अपयशी ठरले.
परंतू त्यांच्या महापरीनिर्वाणानंतर अवघ्या 75 वर्षात हिनयान आणि महायान अशी दोन वैचारिक शकले पडून या वैश्विक शांतीच्या विचाराला तडा देण्यात तेंव्हाचे मनुवादी थोडे यशस्वी झाले.
नंतरच्या काळात……
सम्राट अशोक,सम्राट कनिष्क,सम्राट हर्षवर्धन…
या सम्राटांनी या मानवतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी अर्थात निसर्गवादी धम्माला राजाश्रय देऊन भारताबाहेर या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.
तेंव्हापासून आपल्या देशात आणि ग्रीकमध्ये तसेच संपूर्ण विश्वात या दोनच शक्ती (एक कुटनीतीची शक्ती आणि दुसरी विवेकवादाची निसर्गशक्ती ) एकमेकांसमोर आणि एकमेकांवर क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या लाटेवर स्वार होतानाचा प्राचीन जगाचा इतिहास आहे.
सम्राट हर्षवर्धनानंतर पुष्यमित्र शून्गाने आपल्या कुटनीतीचा पुन्हा घाव टाकला आणि आपल्या देशातून वैश्विक बुद्धाची धम्मक्रांती उखडून टाकण्याचे जोरदार प्रयत्न केले. त्यात त्याला यशही आले. आणि पुन्हा एकदा आपला भारत या मनुवाद्याच्या विळख्यात सापडला…….
यानंतर साढे तेराशे वर्षात या देशात अनेक परकीय राज्यकरकर्त्यांच्या आक्रमणांची स्थित्यंतरे झाली. यात मुस्लिम आक्रमणकर्ते, कुशाणांची आक्रमणे, झाली. दुसऱ्या बाजूला येथील मूळ वंशिक छोट्या छोट्या राजामध्ये एकसंघता नसल्यामुळे परकीय आक्रमणे थोपवू शकली नाहीत. कारण यांच्यात मनूवाद्याच्या सुद्धा कूटनितीने शिरकाव केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता लयास गेलेली होती.
परंतू , साढे तेराशे वर्षात बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या देशातील 43 आक्रमण कर्त्यात शेवटचे इंग्रज मात्र थोडेशे सुधारणावादी असल्यामुळे शेवटच्या काळात लोकशाहीचा वास या देशाला लाभला. हीच इंग्रजांची सुधारणावादी, लोकशाहीवादी भूमिका दुसऱ्यांदा मनुवाद्याच्या जिव्हारी लागल्यामुळे 1857 चा राष्ट्रीय उठाव केला, ज्याला म. फुले भट पांड्याचे बंड म्हणतात.
याच साढे तेराशे वर्षात (पुष्यमित्र शुंगाच्यानंतर विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत) अनेक समाजसुधारकांनी या कुटनीतिविरुद्ध प्रबोधन केले, कुणी तलवारीच्या बळावर सुद्धा तीला शह देण्याचा प्रयत्न केला. कुणी वेगवेगळे तत्वज्ञान निर्माण करुन अनेक पंथांची निर्मिती करुन समाजजागृती करण्याचे अनेक प्रयत्न झाले.
परंतू , एवढ्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा या साढेतेराशे वर्षात या कुटनीतीला कायमचे उखडून फेकण्यात यश आले नाही………………..
अशा काळात…….
भिमराव रामजी सकपाळ
यांचा जन्म झाला……..
टीप :- या लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात….
या लेखाचे 1/2किंवा जास्तीत जास्त 3 भाग येतील ते सर्व भाग आपल्या मोबाईलमधील वयक्तिक मो. नं. आणि व्हाट्सप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करावे….
लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689