स्व. रोटेले यांनी आपले साम्राज्य स्वतः उभे केले :- प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल..

 

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

        आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे स्व.डॉ.चंदनसिंग रोटेले यांच्या स्मृतीदिन व प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना प्राचार्य अश्विन चंदेल म्हणाले की,स्व.रोटेले यांनी आपले साम्राज्य स्वतः उभे केले.

        कोणत्याही पातळीवर त्यांची काम करण्याची तयारी होती.ते एक हसत मुख,बहुआयामी व्यक्तीमत्व होते. प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे म्हणाल्या की,आज आपल्यासाठी वेगळा दिवस आहे.त्याला आपण काळा दिवस म्हणु शकतो

        .रोटेले सरांच्या कार्याची त्यांनी गुणगान करून जाणीव करून दिली.स्व.रोटेले सरांच्या संपर्कात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. 

       शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रंथमित्र सुभाष शेषकर यांनी स्व. रोटेले सरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकुन सरांनी प्रत्येक कर्मचाऱ्यास कार्य करण्याची प्रेरणा देवुन जागृती केली.

       स्व.रोटेले सर बहुआयामी व्यक्तीमत्व,अष्टपैलु व्यक्तीमत्व,सकारात्मक दृष्टीकोनाचे धनी होते.

       त्यांनी परिसरातील सर्वांगीण विकासाची मुहुर्तमेढ रोवली.डॉ. प्रफुल बन्सोड यांनी सरांच्या व्यक्तीमत्वाकडे बघुन कसे राहावे हे कळते, ते एक हिरा होते असे ते बोलले. उपप्राचार्य डॉ. सुनिल झाडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, स्व. चंदनसिंगजी रोटेले आपल्या पुरते मर्यादित नव्हते.त्यांनी चिर तरुण मंडळींचा पुरेपुर फायदा घेतला व विकास घडविला.

        डॉ. खापर्डे यांनीही मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. चंद्रभान खंगार यांनी प्रास्ताविक व आभार मानले. 

      शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रथम पुण्यस्मरण व कृतज्ञता सोहळा महाविद्यालयाचे सभागृहात संपन्न झाला.