दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
नागपूर :-
आदिवासी बाहुल्य गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसंदर्भात तेथील आरोग्य यंत्रणा कार्यरत असली तरी त्यांच्या दुर्लक्षित पणामुळे व अकार्यक्षम कर्तव्यहिनतातंर्गत जिवित हानी होत असल्याचे पुढे आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ४८ तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील जिल्ह्यातील आरोग्य व विविध समस्या आणि विकासकामाकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे झाले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे पद रिक्त असून ते भरल्या जात नाही,औषधींचा योग्य साठा नाही,शस्त्रक्रियेसाठी साधन नाही, अशा परिस्थितीत सरकारच्या निष्काळजी मुळे अशा घटना जिल्ह्यात घडत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवेदनातून केला आहे.
या संदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या कानावर माहिती घातली असता त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली व गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्याकडे विशेष प्राधाण्याने लक्ष देऊन यावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अशाप्रकारची मागणी आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या कडे केली.
यावेळी आमदार अभिजित वंजारी,आमदार धीरज लिंगाडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे,गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.
सोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घेऊन,आरोग्य विभागात खाली असणाऱ्या पदाची तातडीने भरती करण्यात यावी,नियमित औषधी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली.
मृतक महिलेचे काय? म्हणजे तिच्या पतीचे काय होणार? व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग त्यांना काय मदत करणार?