चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
धारगाव : संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व सत्य साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11/12/2023 ला आयोजित करण्यात आला होता यात 100 रूग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी व औषधोपचार शिबीराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला उपस्थित सत्य साई संस्थानचे श्री. नागपूरे जी, श्री. चावरेजी, कहालकर दुःखनिवारक दवाखाना चे डॉ.अक्षय कहालकर, डॉ. प्रियंका कहालकर, पंकज कहालकर, सेवाश्रमचे अध्यक्ष हभप कृष्णानंद चेटूले महाराज, उपाध्यक्ष ईस्तारीजी कहालकर, सचिव कौशल्याताई चेटूले, वामनजी शेंडे,फाल्गुन लांडगे, निलकंठ कायते माजी जि.प.सदस्य, संतोषजी टंडण कोटगाव, लीलाधर घाटबांधे (LIC Agent), विजयजी लांजेवार, सत्यवान चेटूले, दिनेश डोये, डॉ.चिराग चेटूले, तेजस चेटूले, गणेश चेटूले, पुरुषोत्तम कायते, अनिकेत कायते, रजत चेटूले व हितेश शेंडे व कोटगाव, नेरी, गुंथारा येथील भजनी मंडळ व संपूर्ण वारकरी संप्रदायातील बंधू-बघिनी उपस्थित होते व यशस्वितेकरिता सहकार्य केले.
शिबीरात शरीराचे सर्व प्रकारचे दुखणे व मणक्यांचे सर्व समस्या व स्त्रियांच्या सर्व समस्या ह्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला, कमरेत गॅप, गुडघे दुखणे,वात, लकवा सायटिका,मायग्रेन, मणक्यांचे सर्व समस्या, स्त्रीरोग ह्यांवर उपचार करण्यात आला.
मनोगत
संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे भाग्य आज लाभले,दरवर्षी आम्ही तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करतो. आज 100 वारकरी रुग्णांनी लाभ घेतला असून साक्षात विठूमाऊली चेच दर्शन झाल्याचे भास होत आहे. कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा तर्फे सर्वाना विठूमाऊलीच्या आशीर्वादाने निरोगी आयुष्य लाभो.
-डॉ.अक्षय कहालकर, भंडारा