श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : मानवी जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासावृत्ती, सृजनशीलता, कल्पकता अशा अनेक वृतींचा विकास होऊन यातून बालशास्त्रज्ञ निर्माण व्हावेत तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर होऊन गोडी निर्माण व्हावी व गणितातील प्रतिकृती मॉडेल यातून गणितीय संकल्पना सुलभ व्हाव्यात व त्याचा व्यावहारिक जीवनात उपयोग व्हावा यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. 

        याप्रसंगी आळंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या माने, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, शिवाजी जाधव, शशिकला वाघमारे, अनुजायिनी राजहंस, संजय उदमले, नारायण पिंगळे, संजय कंठाळे, अमीर शेख, अनुराधा खेसे, सायुज्यता तायडे, योगिता घोलप, संदीप वालकोळी, मनीषा पवार, लीना नेमाडे, अशोक होवाळ, बाळासाहेब भोसले, अरविंद शिंदे, गोविंद निळे, राजेंद्र सोनवणे, सावळाराम देशमुख आदी उपस्थित होते.

         यावेळी अजित वडगावकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक सुप्त गुणांना वाव मिळतो व यातूनच वैज्ञानिक व गणित तज्ञ तयार होऊन स्वतःचे व शाळेचे नाव उंचवावे यासाठी शुभेच्छा दिल्या. संजय उदमले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकला वाघमारे यांनी व्यक्त केले. परीक्षक म्हणून अनिता गावडे, संजय उदमले, नारायण पिंगळे, अमीर शेख यांनी काम केले.