रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम :- लोहखनिजाच्या जड़ वाहतुकीमुळे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरील बोरी, राजपुर पैच , रामपुर चेक, शिवणीपाठ, रायपुर, ओडीगुडम येथील पीड़ित शेतकऱ्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना 10 नोव्हेबर 2022 ला निवेदन देण्यात आले असून त्या नुसार लगेचच 11 व 12 नोव्हेबर महसूल व कृषि विभागाच्या वतीने कापूस पिकांचे मौक्का पंचनामा व सर्व्हे 100 मिटर पर्यन्त करण्यात आले व शेतकऱ्यांचे आवश्यक कागदपत्रे तलाठी कार्यालय बोरी येथे जमा करण्यात आले, परंतु सदर धूळ ही एक किलोमिटर पेक्षा अधिक असल्याने अंतर वाढवून पुनश्च मौक्का पंचनामा करून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात यावे. कारण शेतकऱ्यांनी बैंकतुन पिक कर्ज, कृषि केंद्रातुन खते व फवारणी ओषधि उधारी व उसनेवारी घेऊन घेतले आहेत.आधीच शेतकरी चिंताग्रस्त असून त्यात धुळीमुळे उभ्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून पीड़ित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तात्काळ राज्य किंवा केंद्र शासन किंवा त्रिवेणी अर्थ मुव्हर्स कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात यावी यासाठी बोरी व परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची शनिवारी भेट घेऊन निवेदन दिले.
बॉक्स
नुकसान भरपाई मिळावे यासाठी प्रयत्नशील!
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व अडि-अड़चन व संकटात मदतीसाठी सदैव तत्तपर असून या आधी शेतकऱ्यांचे विविध अडि-अडचणी सोडविले असून शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे समस्या व प्रश्न मार्गी लावलो.
बोरी व परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या पिकांचे धुळीमुळे नुकसान झाल्याचे निवेदन प्राप्त होताच प्रशासनाकड़े सदर बाब निदर्शनास आणून दिलो असून राष्ट्रीय महामार्गाच्या कड़ेवरील शेतातील सर्व्हे करून नुकसान भरपाईचे योग्य मोबदला मिळावे यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विषय व मागणी लावून धरणार.
आमदार धर्मराव बाबा आत्राम