युवराज डोंगरे/खल्लार
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव 2022-23 चा उद्घाटन सोहळा नुकताच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरी म्हसला येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मांजरी म्हसला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद रुमणे हे होते तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून हेमंत ढेपे सरपंच मांजरी म्हसला हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.कल्पना वानखडे गटशिक्षणाधिकारी प.स.नांदगाव, ह्या होत्या तर विशेष अतिथी म्हणून पल्लवी कांबळे उपाध्यक्ष शा.व्य.स.माजरी म्हसला महेंद्र गारोळे प्रतिष्ठित नागरिक, नाना सिंगणापुरे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, किरण पाटील, मुख्याध्यापक मोखड, सुरज मंडे क्रीडा संयोजक, प्रशांत गुल्हाने, मुख्याध्यापक माजरी म्हसला, संतोष चव्हाण पोलीस पाटील मांजरी, सपनाताई चवरे उपाध्यक्ष शा.व्य.स. सातरगाव, सर्व सदस्य शा.व्य.स.दीपक राऊत, प्रमोद तुमसरे, प्रमोद डोक, रजनीताई मेश्राम, रेखाताई मारकोल्हे सातरगाव स. शा. व्य. स. अनिता कापडे, अतुल खारकर ,मोहम्मद इसाक आदी मान्यवर क्रीडा मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र यावले यांनी केले व पंच व खेळाडू यांना क्रीडा शपथ दिली. तर आभार प्रदर्शन प्रशांत गुल्हाने यांनी पार पाडले.
खेळाडू मशाल घेऊन आल्या नंतर पाहुण्यांचे हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. दोन वर्षानंतर क्रीडा महोत्सवात होत असल्याने मुलांचा उत्स्फुर्त सहभाग नोंदविला व खेळण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता खेळ खूप महत्वाचे असल्याचे सौ.कल्पना ठाकरे गटशिक्षणाधिकारी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नांदगाव बिट मधील जिल्हा परिषद एकूण 35 शाळेतील 360 चे आसपास खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात आपला सहभाग नोंदविला. माध्यमिक चे 9 संघ आणि व प्राथमिक चे 5 संघ असे एकूण 14 सांघिक खेळ प्रकार विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे
वैयक्तिक सामन्यामध्ये प्राथमिक विभाग चे 6 खेळ आणि माध्यमिक विभाग मधे वैयक्तिक 8 स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य दाखविले. मांजरी म्हसला शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत करून निदर्शने सादर केली आणि सातरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाकरिता नांदगाव बिटमधील अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले.
त्यामध्ये प्रामुख्याने, मनीष अवघड, अशोक बेरड, संदीप झाडे, राजेंद्र काळे, सुनील तायडे, संजय अंभोरे, साबीर शेख, रवींद्र गजभिये, मनोज भांदर्गे, प्रशांत सापाने, अनिल देशमुख, संजय नेवारे, रामेश्वर खंडारे, अजय गावंडे, विजय खानजोडे, कमलाकर कदम, किशोर गणवीर, धीरज भागवत, पवन मसराम, उमेश ठाकरे, अतुल खारकर, सय्यद अबरार, राजू कांबळे, प्रशांत खरबडे, गजानन वाके, गजानन होळकर, राजेश कडू, मधुसूदन काळमेघ, मनोहर चव्हाण,, परमानंद वैष्णव, संजय घोम, शंकर कवाने, भाऊराव राठोड, विजय नेमाडे, रमेश शिंदे, इरशाद अहमद, राजू पानतावने, भीमसेन देवरे, दीपक कोष्टी, प्रमोद चोपडे, उत्तम डाखोरे, छाया कराळे, आशा वैद्य, सुमित्रा पालीवाल, उज्ज्वला भडांगे, प्रेरणा पेठे, रेखा सावळे, जयश्री पांडे, अनघा भोपळे, ज्योती जगताप, अनिता जोशी, हर्षमाला मासोतकर, अर्चना कवाने, प्रणिता मनगुळे, राखी सरोदे, मीना नगराळे, राजश्री पांडे, अनिता देशमुख, छाया पोटेकर, कमल पडघम, सुनिता लोणकर, अर्चना बैतूले, प्रियंका राणे, हेमलता भिमटे, सुनीता जुंबळे, अनिता जुंबळे, नलू ससाणे, यांचेसह अनेक शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले व क्रिडा महोत्सव यशसवी केला असे क्रीडा संयोजक सुरज मंडे यांनी कळविले आहे.