प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

        बल्लारपूर:- उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील सभेत महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान केला. “महात्मा ज्योतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भिक मागून शाळा सुरू केल्या” असे निर्लज्ज विधान त्यांनी करून त्यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला त्या विधानाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी व त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली.

      ज्या वर्णव्यवस्थेनी हजारो वर्षापासून अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी व बाबासाहेबांनी जीवाचे रान करून बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या या कार्यामुळेच आज घडीला महिला उत्तुंग भरारी मारत आहेत. आजही मनुवादी लोकांना ही गोष्ट खटकते व त्यांना अजूनही बहुजन समाज गुलामच राहिला पाहिजे असे वाटते. भाजपांच्या नेत्यांनी हेतू परस्पर महापुरुषांचा अपमान करायचा व भावना दुखवायच्या हे भाजपाचे मोठे षडयंत्र असून यामुळे महाराष्ट्राचे राजकीय व सांस्कृतिक वातावरण बिघडले आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी असे बेभान वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावलेल्या असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणी करीता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रशासनाला निवेदन दिले. महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटीलवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे, संपत कोरडे,जयदास भगत यांनी प्रशासनाला दिला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com