रमेश बामनाकर /अहेरी

 

अहेरी :- एटापली येथे आज १२डिसेंबर रोजी सुरजागढ प्रकल्पात जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणी घेऊन एक दिवशीय लक्षणिक उपोषण जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

     एटापली तालुक्यातील सुरजागढ पहाडीवर लोह खनिज उत्कखनन करणारी कंपनी ने केलेल्या करारनाम्या प्रमाणे जिल्हावासियांना घेतले तर जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होऊन एटापली तालुक्याचा कायापालट होणार आहे.परंतु येथील स्थानिक पुढारी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे कंपनी आपले मनमानी पद्धतीने काम करीत आहे.शासन प्रशासन व कंपनीचे लक्ष वेधन्याकरिता भाजपा चे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांच्या पुढाकाराने एटापली येथे एक दिवशीय लक्षणिक उपोषण घेऊन खालील 

१)आम्ही नौकर नाही मालक आहोत, आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्या.

२)स्थानिक आय टी आय मध्ये प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी नौकरी द्या.३)मल्टीस्पेशालिष्ट दवाखाना एटापली मध्ये बनविण्यात यावे.४)ट्रक मधून उडणाऱ्या धुळी मुळे लोकांना अनेक आजाराना सामोरे जावा लागणार आहे, त्यावर कायमचा तोडगा काढणे.५)आलापली ते आष्टी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे.६)उडणारे धुळीमुळे शेतीचे होणारा नुकसान त्वरित भरपाई करून देणे.७)सी. सी टीव्ही कॅमेरा सह धर्मकाटा लावण्यात यावे.

८)खाणीत काम करणाऱ्या सर्व मजुरांची इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात यावी.९)बल्लारशहा, आलापली, एटापली, सुरजागढ रेल्वे मार्ग बनविण्यात यावे.१०)स्थानिक बेरोजगारांना खान पट्ट्याचे युनिट देण्यात यावे.

 हे प्रमुख मागण्या घेऊन एटापली चे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली व कंपनी चे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.वरील मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यन्त टप्या टप्प्यात लोकशाही मार्गाने मोठया प्रमाणात आंदोलने घेणार व आमचे हक्काचे रोजगार आणि बाकीचे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा आमच्या हक्काच्या रोजगारासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागणार असे निवेदनातून ईशारा देण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा जिल्हाध्यक्ष यांनी कंपनी ची मनमानी खपवून घेणार नाही लवकरच पाचही तालुक्याचे शिष्टमंडळ युवा नेता संदिप कोरेत यांच्या नेतत्वाखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून रोजगार व बाकी चया मागण्या पूर्ण करून घेऊच अशी गवाही दिली तर आमदार होळी यांनी मी तुमचा आमदार नाही पण महाराष्ट्र विधानसभा चा आमदार म्हणुन तुमचा समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणारा

संदीप कोरेत बोलले की लाक्षणिक उपोषण पासुन या आंदोलनाची सुरुवात झाली आहे आमचे मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकशाही पद्धतीने आंदोलनं सुरूच राहणार आणखीही अनेक पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले

या वेळी मंचावर जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, गडचिरोली चे आमदार देवराव होळी, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव कुथे गुरुनी,युवती जिल्हाध्यक्ष प्रीती शंभरकर,प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी संदिप कोरेत,जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कनपलीवार,एटापली तालुकाध्यक्ष विजय नल्लावार,तालुका महामंत्री दीपक सोनटक्के,तालुका उपाध्यक्ष बाबला मुजुमदार,जनार्दन नल्लावार माजी उपसभापती,तालुका उपाध्यक्ष बंडू ईष्टम,आदिवासी आघाडी तालुकाध्य दामोदर नरोटे,नगरसेविका निर्मला कोंडबतुलवार,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर डेकाटे,अहेरी चे महामंत्री पोशालू चुदरी,सिरोंचा चे उपाध्यक्ष वसंत डुरके, गुरूदास मडावी तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुक्यातील युवा मोर्चा, आदिवासी आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते, व हजारोच्या संख्येने बेरोजगार युवक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com