प्रितम जनबंधु
संपादक
दिनांक १२/१२/२०२२ रोज सोमवारला सायंकाळी ६:००वाजता आभास बहुउद्देशीय संस्था वैशाली नगर खात रोड भंडारा द्वारा
नागपूर येथील नव दांपत्याचे लग्न निशुल्क लावण्यात आले.
या विवाह सोहोळ्याप्रसंगी सन्मानिय प्रशांतजी बागडे, तुळशीरामजी गेडाम, प्रशांतजी सुर्यवंशी, आर. आर. बन्सोड गुरुजी, संस्था सचिव सौ संध्या बन्सोड, विहार अध्यक्ष पविता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, सन्मानिय मंसारामजी दहिवले यांच्या हस्ते लग्न सोहळा पार पाडण्यात आला.
सदर विवाह सोहोळ्याला ५० ते ६० उपासक/उपासिका प्रामुख्याने हजर होते. तसेच नव दांपत्यांना आभास मंगल परिणय संस्थेकडून गृहोपयोगी साहीत्य आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रतिक बन्सोड, कोमल बन्सोड यांनी विषेश सहकार्य केले.