प्रितम जनबंधु
संपादक
भंडारा
दिनांक, १३ डिसेंबर २०२२
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक १७ डिसेंबर २०२२ ला होत आहे. सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांत मोठया प्रमाणात ग्रामपंचायती निवडणुकाही होत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची दिनांक १७ व १८ डिसेंबर या तारखेला निवडणूक कर्तव्याकरिता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकान्यांनी सेवा अधिग्रहीत केल्यामुळे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भंडारा जिल्हयातील मतदार असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मतपत्रिका मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात यावी किंवा त्यांना मतदान करुन झाल्यावर दुपारी १ वाजता पर्यंत निवडणूक कर्तव्यार्थ येण्यासाठी सुट देण्यात यावी. असे आदेशात स्पष्ट नमुद करावे अशा मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक सेलचे प्रदेश सहसंयोजक डॉ उल्हास फडके व जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर यांच्या नेतृत्वाखाली मा निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांना देण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर बोडखे, मेघश्याम झंझाड, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, अरविंद बारई, महादेव साटोणे, अभाविपचे रोशन ठाकरे, सार्थक कुंभलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जनता शिक्षक महासंघाच्या वतीने सुद्धा सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.