कमलसिंह यादव

ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी नागपूर 

      मिलिंद खोब्रागडे या वेकोलो माजर खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यास देशी माऊजरने गोळी मारणाऱ्यास पारशिवनी पोलिसांनी अटक केली असून,त्यांची विविध प्रकारे चौकशी करण्यात येत आहे.

         पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजनकाटया जवळ मिलींद खोब्रागड़े यांचा सह दोन सुरक्षा कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी समीर सदरूल सिद्धिकी,राहुल जोसेफ जेकब हे दुचाकी वाहनाने प्रति बंधीत क्षेत्रात जात असतानी मिलींद खोब्रागडे ने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली असता राग मनात ठेऊन आरोपी समीर ने शिविगाळ करून त्यास मिलींद खोब्रागडे वर देशी माऊजर दोन गोळया मारू न गंभीर जख्मी केले होते.

     कन्हान पोलीसांनी आरोपीला अटक करून पोस्टेला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

         प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.११) डिसेंबर ला दुपारी ४ वाजता महा.सुरक्षा रक्षक मिलींद खोब्रागडे वप २९ वर्ष वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटयाजवळ पेट्रोलिंग करित होता. त्याचे मागे थोड्या अंतरावर तक्रारदार महेश वामनरावजी नासरे वय ३४ वर्ष ह.मु. सीएमपीडी आई कॅंम्प सब एरीया ऑफिस काॅलोनी खदान नं ३ सह राहुल बेलख डे व शमीक पुसदेकर असे तीघे पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा आरोपी समीर सदरूल सिद्दीकी वय ३० वर्ष  व राहुल जोसेफ जेकब  वय २६ वर्ष हे होंडा सीडी डिलेक्स क्र एम एच ४०- आर – ६२७२ दुचाकीने मॅनेजर रूम मागुन प्रतिबंधित क्षेत्रात कोल डेपोकडे जात  असल्याने मिलींद खोब्रागडे याने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्या दोघांनी मिलींद खोब्रागडे शासकीय कर्तव्य बजावित असतांना  शासकिय कामात अ डथळा निर्माण करून  राग मनात ठेऊन याचे सोबत शिविगाळ करून धक्काबुक्की केली आणि आरोपी समीर सदरूल सिद्दीकी याने त्याचे जवळील देशी माऊजर काढुन मिलींद खोब्रागडे च्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्दे शाने दोन गोळ्या झाडुन कमरेवर मारल्याने तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर तिसरी गोळी मारून गंभीर जखमी केले. आरोपी राहुल जेकब ने मध्ये हात आडवल्याने एक गोळी त्याच्या डाव्या हाताच्या पंजा ला मागील बाजुस गोळी लागली. आरोपीने गोळीबार करून जात माऊजर हवेत ऊंचावुन परिसरात दहशत पसरवुन भीतीचे वातावरण निर्माण केल्याने परिसराती ल लोक सैरावैरा पळु लागले. काही लोकांनी आपल्या घराचे दारे व खिडक्या बंद केल्या तसेच एक चाय टपरी वाला भीतीने टपरी बंद करून पळुन गेला. काही वेळातच महेश नासरे यांनी लगेच ऑफिस मधिल गार्ड सोनु देविया यास बोलावुन ऑफिसच्या गाडीने मिलींद खोब्रागडे ला गाडीत टाकुन उपचाराकरीता जे.एन दवाखाना कांद्री-कन्हान येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यास रेफर केल्याने खाजगी आशा हॉस्पीटल कामठी येथे दाखल केले. (दि.१२) ला मिलींद याची शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली आणि पुढील उपचार सुरू असुन मिलींद सध्या ही मुत्युशी झुंज देत असल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.

         सदर प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वयेशन शाखा नागपुर ग्रामिण पथक व कन्हान पोलीसानी आरोपी समीर सदरूल सिद्धिकी राहणार अष्टविनायक कालोनी टेकाडी व राहुल जोसेफ  जेकब राहणार गिने मोहल्ला कांद्री  यांस ताब्यात घेऊन

फिर्यादी महेश वामनराव नासरे वय३४ वर्ष . राहणार तिनखेडा ता नरखेड हल्ली मुकाम cmpdi कॅम्प न्यु सव एरिया आफिस कालनी न ३ यांचे तक्रारीने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३०७, ३५३ ,३४ भादंवी सह कलम ३/२५ ऑर्म अँक्ट भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.  सोमवार (दि.१२) कामठी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिशानी दोन्ही आरोपी चा तीन दिवसाचा म्हणजे (दि.१५) गुरुवार पर्यंत कन्हान पोलीसांना पुढील तपासा करिता पीसीआर दिला आहे.  कन्हान पोलिस व गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पुलिस पुढील तपास करित आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News