दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच महात्मा फुले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या संस्था काढल्या त्या संस्था भिक मागुन काढल्या असे आक्षेपार्य विधान केले. त्याचा निषेध म्हणुन पिंपरी चिंचवड येथील काही आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली, हे करणे चुक आहे.पण ती एक भावनिक प्रतिक्रिया होती असे पुणे महापालिकेचे उपमहापौर डाॅ.सिध्दार्थ धेंडे म्हणाले आहे. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर चुकीचे कलम लावली. 307 . 120 ब ही कलमे काढुन टाकावी. तसेच जर भाजपचे नेते वारंवार फुले शाहु आंबेडकर यांचा अपमान करणारी विधाने करत आहे. रिपब्लिकन पक्ष हा समतेच्या विचारावर आहे. आणि राजकीय फायद्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या विचारांनुसार काम करतो, त्यामुळे भाजप बरोबर युती असुन ही भाजप चे वरिष्ठ नेते जर नेहमीच बाबासाहेबांचा अपमान करणारी विधाने करत असेल तर. मला अशा युतीबरोबर काम करण्यास अवघड होत आहे. त्यामुळे जर भिमसैनिकावरील चुकीचे गुन्हे मागे घ्यावे आणि भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल चुकीची विधाने करु नये. अनथा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणुन काम करेन आणि मी पक्षाचा राजीनामा देतो असे पत्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना धेंडे यांनी पाठवले आहे.