
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकीचा ज्वर उमेदवारांत चांगलाच चढलेला आहे.स्वत:ला विजयी करण्यासाठी तन,मन,धन,चा उपयोग ते करणार आहेत.
मात्र,प्रचार सभेतील गर्दी हे उमेदवारांच्या विजयाचे संकेत राहतातच असे नाही.एखाद्या राष्ट्रीय नेत्यांना बघण्यासाठी,”उमेदवारच सभास्थळी गर्दी, जमवीत असल्याने गर्दीतील मतदार हा नेमका त्याच पक्षाचा असेल असेही नाही.
यामुळे प्रचार सभा मधील गर्दी ही उमेदवारांना विजयी करणारी असेल असे गृहीत धरले जात नाही.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतंर्गत महाराष्ट्र राज्यातील मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडे दिसतो आहे.याचबरोबर महायुतीच्या सत्तेला महाराष्ट्र राज्यातील मतदार वैतागले असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या प्रचार सभा सुध्दा महायुतीच्या उमेदवारांना यावेळी तारणार नसल्याचे संकेत पुढे येत आहेत.
तद्वतच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याला व कर्तव्याला महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी समजून घेतले असल्याने त्यांना,व त्यांच्या साथीदारांना महाराष्ट्र सिंहासनावरुन सत्ताच्युत व्हावे लागणार आहे.
गर्दीत अपवादात्मक उमेदवारच विजयी ठरतात किंवा पक्षाची हवा असली तर पक्षाच्या बलावर निवडून येतात हे राजकीय चित्र नाकारता येत आहे.