इंदापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रचारसभा झाल्या त्या त्या ठिकाणी मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे :- तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          2024 च्या विधानसभेचे अधिकृत उमेदवार दत्तामामा भरणे यांची बुधवार दिनांक 13 /11 /20 24 रोजी उद्धट व लासुरणे येथे जाहीर सभा संपन्न होणार..

         उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर मतदान करण्यासाठीच मतदारांना संबोधित करणार…

            इंदापूर तालुका विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माहितीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रेय मामा भरणे यांची जाहीर सभा, व मतदारांना घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्यासाठी आवाहन करून जाहीर सभा होणार आहे.

          बुधवार दिनांक 13/ 11/ 20 24 रोजी सकाळी 11 वाजता उद्धट संध्याकाळी 7 वाजता लासुरने या गावामध्ये मोठी जाहीर सभा होणार असल्यामुळे प्रत्येक गावा गावामध्ये मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून दत्तात्रय मामा भरणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागतही होत आहे.

        छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दत्तात्रेय मामा यांच्या उपस्थित होत आहे. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचाही सन्मान दत्तात्रय मामा भरणे करीत आहेत.

           प्रमुख उपस्थिती इंदापूर तालुका विधानसभेचे उमेदवार माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर ,ज्येष्ठ नेते प्रशांत पाटील,जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, दत्तामामा घोगरे, अण्णासाहेब कोकाटे, संग्राम पाटील,अतुल झगडे, नवनाथ रुपनवर, सह आदी मान्यवरांच्या उपस्थित जाहीर सभा होणार असल्याचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.