सावली तालुक्यात भात पिकावरील लष्करी अळीची कृषि अधिकाऱ्यांनी केली पाहणी…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

           सावली तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचे प्रादुर्भाव झाल्याबाबत वृत्तपत्रात प्रकाशित केले होते. त्याचीच दाखल घेत कृषि विभागाचे अधिकारी व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी भात पिकावर लष्करी अळीचा परदुर्भाव झालेल्या क्षेत्राची पाहणी केली.

           सावली तालुक्यातील भात पिक परिपक्वता ते काढणीचे अवस्थेत असून तालुक्यातील काही क्षेत्रातील भात पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अलिचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांचे हातात आलेल्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे.

        त्याच अनुषंगाने कृषि विभागाचे कृषि उप संचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषि अधिकारी गजानन पवार, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नागदेवे, तालुका कृषि अधिकार ललित राऊत, मंडळ कृषि अधिकार दिनेश पानसे यांनी साखरी, लोंढोली, जाम बूज व केरोडा क्षेत्रात प्रतिनिधिक पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना लष्करी अळीचे नुयंत्रणा बाबत मार्गदर्शन केले.

           शेतकऱ्यांनी परिपक्वता पूर्ण न झालेल्या उभ्या भात पिकावर तसेच परिपक्वता होऊन कापणी झालेल्या भात पिकाचे कळपांवर आयसोकलोरोसेम 18.10 टक्के 6 मि.ली. किंवा इमॅमेक्टिन बेनझोयेट 1.5 टाके + प्रॉपनोफॉस 35 टक्के डब्लूजी किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मी. ली. 10 लिटर पाण्यातून फवारण्याचा सल्ला देण्यात आला.

          लष्करी अलिमुळे पिकाचे संपूर्ण महसूल मंडळातील क्षेत्रावर लागण होऊन संपूर्ण मंडळात उंबरठा उत्पादनाचे प्रमाणात पिकाचे नुकसान पिक कापणीचे प्रयोगात दिसून आल्यास पिक विमा लागू होईल, तसेच लष्करी अलिमुळे नुकसान ग्रस्त क्षेत्राची माहीती शासनास सादर करण्यात आल्याबाबत कृषि अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.