बसपाला मतदान करु नका,केल्यास मारण्याच्या व खून करण्याच्या मतदारांना धमक्या!

 प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          मध्यप्रदेश मध्ये सर्व मतदार संघात एकाच वेळी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.मतदान करण्याचा दिवस जसजसा जवळ येवू लागलाय,तसेच तेथील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

          मात्र,अयोग्य विचाराने प्रेरित असलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बसपाला मतदान केल्यास तुमचे खून करु किंवा तुम्हाला मारु अशा प्रकारच्या धमक्या मतदारांना दिल्या जात असल्याचे प्रकार पुढे येवू लागले असल्याने मध्यप्रदेश मधील मतदार भयभीत झाले असल्याचे दिसून येते आहे.

             भारत देशात,”बहुजन समाज पार्टी,असा एकमेव पक्ष आहे की या देशातील नागरिकांना लाचार व गुलाम मानसिकतेतून सातत्याने बाहेर काढतो आणि स्वाभिमानी बनवतो.याचबरोबर बोलल्या प्रमाणे कर्तव्य पार पाडून नागरिकांच्या सर्वांगिण हितासाठी सक्षम धोरणे आखून त्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतोय.

            तद्वतच बसपाला परावलंबी आणि लाचार समाज तयार करायचा नाही तर स्वतःच्या श्रमावर अवलंबून असणारा मजबूत समाज घडवायचा आहे.यामुळेच बसपा सत्ताधारी झाल्यास सर्व समाज घटकातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी धोरणे आखून त्या सर्व वंचित,शोषीत,अत्याचारग्रस्त व अन्यायग्रस्त समाजाला मजबूत व सक्षम करेल या भितीपोटी अयोग्य प्रवृत्तीचे गुंड लोक बसपाला मतदान करु नये यासाठी मतदारांना खून करण्याच्या व मारण्याच्या धमक्या देवू लागले आहेत व या अनुषंगाने मध्यप्रदेशातील मतदारांचे व्हिडिओ अंतर्गत मते पुढे येवू लागले आहेत.

           स्वातंत्र्य गणराज्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर सुध्दा निवडणूक प्रक्रिया दरम्यान मतदारांना धमकावून मत वळते केली जात असतील तर मतदारांना धमकावणारे गुंड प्रवृत्तीचे लोक या देशातील निवडणूक विभागाची थट्टा करतात की निवडणूक विभागाला मानत नाही हा प्रश्न पडतो आहे.

             एखाद्या पक्षाला मत देण्यासाठी व एखाद्या पक्षाला मत न देण्यासाठी मतदारांना धमकविल्या जात असेल तर विधानसभेची निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व पारदर्शक पार पाडण्यासाठी मध्यप्रदेशातील निवडणूक विभाग व संबंधित पोलिस यंत्रणा दक्ष आहेत काय?यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागली आहेत.

            विधानसभा निवडणूक हे केंद्रीय व राज्य निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली आणि अधिकारपत्याखाली होत असल्यामुळे त्यांनी निवडणूक काळात सर्व प्रकारच्या गतिविधिकडे सतर्कपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

           मध्यप्रदेश अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा गाफील राहात असतील तर तेथील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त होणार नाही असे चिन्हे दिसू लागली आहेत.

         मात्र,या देशातील भांडवलशाही विचारांच्या व मनुवादी कृतीच्या लोकांना बसपाची भिती का म्हणून आहे?हे तरी त्यांनी मतदारांना सांगितले पाहिजे.

          मध्यप्रदेशात आणि छत्तीसगड मध्ये बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीची स्थिती भक्कम व मजबूत होत  आल्याने भाजपा व काँग्रेस पक्ष सुत्रधारांची झोप उडाली आहे.

       आणि म्हणूनच बसपाला मतदान करु नका यासाठी मतदारांना धमकविल्या जात असल्याचे नाकारता येत नाही.