कमलसिंह यादव
पारशिवनी-कन्हान
पारशिवनी :- स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी पुर्ण झाल्याने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख रमेश कारमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान येथील आबेडकर चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रहार अपंग क्रांती कन्हान द्वारे आज सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान जल्लोष करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री,आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग यांच्या विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी रेटून धरली होती आणि यासाठी ते आक्रमक भूमिका वठवित होते.
त्यांच्या भुमिका अंतर्गत भावना लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिदें यानी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले असल्याचे सार्वजनिक केले.
यामुळे शासनाचे आभार व मागील २५ वर्षाच्या लढ्याला आलेल्या यशाचा आनंद कन्हान येथे साजरा करण्यात आला.या प्रसंगी रमेश जी कारेमोरे , रामटेकचे माजी नगरसेवक उमेश महाजन, प्रयास ठवरे ,राहुल बावणे,सुनील कडू,कृणाल महाजन,प्रफुल वाडीभसमे,संतोष रोकडे, राजकुमार वझेकर,सुमित देशमुख ,अंकित कडू,आकाश ढोबळे,रुपेश पाठक,सुखदेव मथुरे ,राजु किसन राऊत (अध्यक्ष प्रहार दिव्यांग संगठना कन्हान शहर) विजय सर पारधी, सागर फरकाडे, राजेश्वरी पिल्ले, प्रविण शेंडे वाहतुक अध्यक्ष प्रविण बेलखोडे, युवाअध्यक्ष मयुर भोपडे, शैलेश भलावी राहुल बावणे, सुषमा कारेमोरे, पारशिवनी चे प्रमुख अभिषेक एकुणकर आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ता व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.