वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसैनिकांचा थेट जनतेशी संवाद… — शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे  ‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियान… — जनतेनी सक्रिय  सहभाग घ्यावा.:-विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे आवाहन…

 

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

 

 शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लवकरच वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना  पक्षांतर्गत,‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियान राबविण्यात येणार आहे.

         या अभियानात शिवसैनिक थेट जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. 

           तसेच सध्याच्या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्यात येणार आहे.   शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या  ‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियानात जनतेनी सक्रिय सहभाग घ्यावा. असे आवाहन वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

        वरोरा व भद्रावती येथे ‘ होऊ द्या चर्चा..!’अभियानाच्या पुर्वतयारीसाठी बैठका

‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियान  प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने  नियोजन करण्यासाठी वरोरा -भद्रावती विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिक बंधू -भागिनिंच्या महत्वपूर्ण बैठका आयोजित केलेली आहे.

           भद्रावती येथे श्री मंगल कार्यालयात दि. १६ सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता  तसेच वरोरा येथे पक्षाच्या ‘ शिवालय ’ मध्यवर्ती कार्यालयात  दि. १७ सप्टेंबर रोज रविवारला दुपारी बारा वाजता सदर बैठकांचे आयोजन वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.

         याप्रसंगी दोन्ही तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना,शिवसेना महीला आघाडी, युवा- युवती सेना व सर्व शाखांचे पदाधिकारी , शाखाप्रमुख,बुथ प्रमुख व सर्व शिवसैनिक बंधू -भगिनी उपस्थित राहतील.

       दोन्ही बैठकीत जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा-भद्रावती विधानसभा सघंटक वैभव डहाने ,विधानसभा समन्वयक मगेश भोयर ,भद्रावती तालुका प्रमुख नरेद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, उपजिलहा महीला सघंटीका माया नारळे ,वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, भद्रावती तालुका संघटीका अश्लेषा जिवतोडे, वरोरा शहर संघटीका प्रिती पोहाने, भद्रावती शहर संघटीका माया टेकाम, वरोरा  कृषि उत्पन्न बाजार समिती संचालिका  कल्पना टोंगे,उपतालुका प्रमुख तथा वरोरा  कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजीत पावडे, उपतालुका प्रमुख  तथा  वरोरा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक विलास झिले,शहर समन्वयक  भावना खोब्रागडे, उपतालुका सघंटीका शिला आगलावे , माजरी शहर प्रमुख रवि रॉय, विधान सभेतील सर्व पदाधिकारी  तसेच वरीष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार असुन  ‘ होऊ द्या चर्चा…! ’ या अभियानावर  सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

          वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व्दारा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात अंशी  टक्के समाज कार्य  व वीस टक्के राजकारण  या तत्वावर विविध  उपक्रम सातत्याने राबविले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन थेट जनतेपर्यत जावुन त्यांच्याशी विविध रुपाने नाळ जोडण्याचा प्रयत्न शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष करीत आहे. याच सबंधाने ‘ होऊ द्या चर्चा…! ’ अभियानात थेट जनतेत जावुन मतदारांना बोलते करणारा उपक्रम पक्षातर्फे ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातुन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री राहुन जनकल्याणकरीता कार्य केले. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोना काळातील त्यांची कारकिर्द उल्लेखनिय राहिली. संयमी राहुन कामाचा धडाका त्यांनी राज्यात राबविला होता.

            त्याउलट ज्यांना शिवसेनेने  आमदारांना बनविले तेच पक्षाला बेईमान झाले . त्यांनी विद्यमान सरकार स्थापन केले. खोटे बोला पण रेटुन बोला या उक्तीप्रमाणे केवळ बोलघेवडेपणा करुन सध्या राज्य सरकार जनतेची दिशाभुल करीत आहे.

         या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर यावा. फक्त कागदावर व नेत्यांच्या तोंडावर असलेल्या योजनांचा भांडाफोड व्हावा, जनतेशी थेट संवाद साधून  एक फुल दोन हाफ सरकारचे अपयश जनतेसमोर आण्याकरीता या विद्यमान सरकारच्या बोलघेवड्या कामाची व योजनांची पुरेपूर कल्पना जनतेपर्यंत पोहचावी. या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

        या अभियानातून  वरोरा – भद्रावती  विधानसभा क्षेत्रातील विविध सार्वजनिक समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या समस्यांना वाचा फोडल्या जाईल. तरी या बैठकी करीता विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा व्हावी. या हेतुने सदर नियोजन बैठकांचे  आयोजन करण्यात आलेले असुन वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व आजी -माजी जेष्ठ पदाधिकारी यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांनी केले आहे.