नीरा नरसिंहपुर दिनांक :13
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार ,
गणेशवाडी तालुका इंदापूर येथे गावच्या विकास कासाठी जीवन आवश्यक आसणाऱ्या पिण्यासाठी पाणी या प्रश्नाची आनेक वर्षापासून आडचण होती. त्या कामासाठी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 1 कोटी 18 लाख रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजन माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले . गेल्या 40 ते 50 वर्षापासून गणेशवाडी गावच्या विकासासाठी एवढा मोठा निधी कधीच गावाला आला नव्हता. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोठा निधी पिण्याच्या पाण्यासाठी दिल्याबद्दल गणेशवाडी गावच्या वतीने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून आभार व्यक्त केले.
गणेशवाडी गावसाठी प्रत्येक घरोघरी नळ पाणी पुरवठ्याच्या भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की,, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हांडा खाली उतरावयाचा आहे. डोक्यावरती हंडा घेऊन पाण्याला गेली नाही पाहिजे. तोच हंडा खाली. उतरवण्यासाठी प्रत्येक घरो घरी नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या माध्यमातून करण्यात येईल. गणेशवाडी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. गावचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आनेक योजनेतून गावच्या विकासासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील तसेच खंडोबाच्या सभा मंडपाला देखील 5 लाख रुपये निधी मंजूर केले आसे दत्तात्रय भरणे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगीतले. येथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे ग्रामस्थांनी उभे राहावे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भूमिपूजन प्रसंगी उद्गार.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, दत्तामामा घोगरे, श्रीकांत दंडवते, श्रीकांत बोडके, विजुभाऊ घोगरे, रविराज घोगरे, मयूर घोगरे, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षीरसागर, तुकाराम घोगरे, नरहरी काळे, चंद्रकांत सरर्वदे, आरुण क्षीरसागर, नागेश गायकवाड, प्रताप पालवे, विजय गायकवाड, पांडुरंग कांबळे, दत्तात्रय घोगरे, संतोष सुतार, पांडूदादा बोडके, सुदर्शन बोडके, नामदेव शिरसागर, नाथा रुपनवर, समाधान बोडके, उमेश घोगरे, विठ्ठल देशमुख, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले तर प्रशांत पाटील, विजय गायकवाड, यांनी यावेळी प्रस्ताविक मध्ये आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व या भागातील सर्वच ग्रामस्थ व महिला भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुणे
जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले.