प्रदीप रामटेके

     संपादकीय

         चुकलेले व्यक्ती (स्त्रि-पुरुष) हे आपल्या वैचारिक विधानाद्वारे पुढील व्यक्तीकडे भावना मोकळ्या करून उज्वल भविष्यासाठी चूकेला मान्य करीत असतील व स्वतः स्वतात बदल घडवून उत्तम आयुष्य जगण्यासाठी कटिबद्ध होत असतील तर अशा व्यक्तींना क्षमा करणे म्हणजे आपण आपले योग्य वैचारिक कर्तव्य आणि उत्तम कर्म दायित्व पार पाडणे होय.

          क्षमा करणे यावर अनेक तत्वज्ञानी आपापल्या परीने मतेमत्तांतरे मांडले आहेत.मात्र,योग्य कर्तव्यासाठी व उत्तम कर्म दायित्वासाठी परिवर्तनीय होणे व परिवर्तनवादी बनने हा प्रत्येक नागरिकाचा नैसर्गिक व कृत्रिम असा मुलभूत अधिकार आहे.तद्वतच उत्तम जिवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीतीत सुप्त व शुक्ष्म गुणधर्म आहेत.या सुप्त व शुक्ष्म गुणधर्माची जाणिव संबंधित व्यक्तीला करून देणे हे प्रत्येक जाणकार व्यक्तींचे आद्य कर्तव्य असते हे नाकारून चालणार नाही.तसेच सत्ताधाऱ्यांचे अत्यावश्यक जबाबदार असे परम कर्तव्य आहे असे सर्वांनी मानलेच पाहिजे. 

      भारत देशातील अनेक नागरिकांना चारित्र्यान्वये सुप्त व शुक्ष्म गुणधर्माची जाणिव नसल्यामुळे अनभिज्ञपणे व जाणिवेतून अनेक प्रकारच्या चुका बऱ्याच नागरिकांकडून होत असतात हे उघड आहे.

       मात्र,सौम्य चूका व घातक चूका यात जेवढा फरक असतो तेवढाच समजून घेणाऱ्या व समजून देणाऱ्या व्यक्तींच्या वैचारिक कार्यभागात फरक असतो हे सुद्धा निर्विवाद सत्य असते.आपण कशा प्रकारे समजून घेतो व कशा प्रकारे समजून देतो यावर सुध्दा प्रवृत्ती आणि वृत्ती बाबतचा बदलाव अवलंबून असतो.

      अनभिज्ञपणे चुका करणाऱ्या व्यक्तींना चारित्र्यान्वये आयुष्य जगणे साधे सोपे नाही हे अनेक प्रकारच्या मानवी वृत्त्या व प्रवृत्त्या सांगून जातात.मात्र त्यांच्यातील बदलाव हा मानूसिकीचा कणा असेल तर तो बदलाव त्या व्यक्तीला श्रेष्ठ बनवितो आणि त्याला लौकिक मिळवून देतो हे वास्तव आहे.

       [… हत्या,सामाजिक अत्याचार,सामाजिक व इतर प्रकारचे शोषण,चोरी,लैंगिक अत्याचार,जातीभेदातंर्गत व इतर वैयक्तिक अत्याचार ह्या गंभीर बाबी असतात..यावर क्षमेचे मत व्यक्त करणे बरोबर नाही.. …]

       अनभिज्ञपणे व जाणिवेतून होणाऱ्या चुकांत सुधारणा घडवून आणता येत असतील व सदर सुधारणा अंतर्गत योग्य अशा घडामोडी घडत असतील आणि अनेक नागरिकांचे जीवन सुधारणे अंतर्गत उज्वल असे ठरत असेल तर क्षमा करणे हे योग्य कर्तव्यात व उत्तम कर्म दायित्वात मोडते आहे.

        आपल्या देशाला व देशातील नागरिकांना चारित्र्य संपन्न करणारी,”सखोल व सुटसुटीत असी वैचारिक देण,तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली आहे.तथागत भगवान गौतम बुद्धांचा वैचारिक उपदेश हा सर्व काळात सर्व नागरिकांसाठी कल्याणकारी व मंगलमय आहे.

       तद्वतच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारातंर्गत उपदेशात भेदभाव नाही,विषमता नाही,उचनिच्चता नाही,शोषण व अत्याचार नाही,अन्याय नाही,मनुष्यमात्रांची कुठल्याही प्रकारची हानी नाही,लपवाछपवी नाही व कुटील डावपेच नाहीत,निंदानालस्ती नाही,एकमेकांचा विरोध नाही आणि एकमेकांविरुद्ध कार्यपद्धत नाही,हत्या-चोरी-व्याभिचार-मद्यपान करणारी आणि खोट बोलणारी अनुशासनता नाही.

       तर प्रत्येक मनुष्य मात्रांचे चारित्र्य संपन्नतेला अनुसरून सर्व प्रकारचे कल्याण आणि मंगल आहे,चारित्र्य संपन्नतेला अनुसरून सर्व प्रकारचे सुख व सर्व प्रकारची शांती आहे – सर्व प्रकारची समजदारी आहे,सर्व प्रकारची उन्नती आहे व प्रगती आहे,सर्व प्रकारची उत्तम वैचारिक धन संपदा आहे,सर्व प्रकारच्या मानुसकीची जाणिव आहे व ओळख आहे,बंधुत्वा अंतर्गत सामाजिक व इतर प्रकारची समता आहे,स्वातंत्र्या अंतर्गत सदोदित न्याय कार्यप्रणाली आहे..

       तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सर्वोत्तम ज्ञानविचारांकडे व सर्वोत्तम वर्तणूक कर्मशिध्दांताकडे दुर्लक्ष करणे किंवा दुर्लक्ष करणारी कार्यपद्धत अवलंबिने म्हणजे सर्व नागरिकांची अधोगतीकडे वाटचाल होय.

     तथागत भगवान गौतम बुद्धांना व त्यांच्या विचारांना देशाचे सत्ताधारी,राज्यांचे सत्ताधारी,राजकारणी व समाजकारणी,देशातील नागरिक केव्हा समजून घेणार?

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com