प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, माजी भंडारेस्वर देवस्थान समिती अध्यक्ष आणि वैरागड येथील भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक माहितीची जाणकार असणारे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष स्व. श्रावण रघुनाथ नागोसे यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि बुक देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्व. श्रावण नागोसे गावात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्ती होते. त्यांचे दि. १२ नोव्हें.२०२१ रोजी हृदय विकाराने निधन झाले होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रीत्यर्थ राहत्या घरी मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि बुक वाटप करण्यात आले.
श्रद्धांजली कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, ग्राम. पं. सदस्य आदेश आकरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मुखरू खोब्रागडे, जगदीश पेंद्राम, भंडारेस्वर देवस्थान समिती अध्यक्ष बालाजी पोफळी, सचिव विश्वनाथ ढेंगरे, सदस्य केशव गेडाम, लीलाधर उपरे, दिनकर लोथे, निंबा टेकाम, से. स. संस्था अध्यक्ष महेंद्र तावेडे, रमेश पगाडे, खुशाल पेंदाम, नेताजी नेवारे, अजय नव्हाते, हरेश बावनकर, राजू बावणे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि नागोसे परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नेताजी बोडणे सर तर उपस्थितांचे आभार प्रशांत नागोसे सर यांनी मानले.