कन्हान येथील आंबेडकर चौक येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.. — तिन दिवसीय कार्यक्रमास प्रारंभ..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

कन्हान : चंद्रशेखर भिमटे मित्र परिवार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने कन्हान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       चंद्रशेखर भिमटे मित्र परिवार कन्हान (नागपुर) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवारला (दि.12 ऑक्टोंबर) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        रविवार (दि.13 ऑक्टोंबर) ला महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समक्ष मध्यरात्री 12 वाजता बुद्ध वंदना करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात येणार आहे.

         सोमवार (दि.14 ऑक्टोंबर) ला सांयकाळी 4.00 वाजता प्रसिद्धी टीव्ही सिंगर, कवी लेखक,कव्वाल गायक,प्रबोधनकार राहुलजी शिंदे यांचा सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे आयोजित करण्यात आला आहे. 

       या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण परिसरातील जनतेला प्रामुख्याने उपस्थित रहावे असे आव्हान चंद्रशेखर भिमटे मित्र परिवार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने केले आहे.

        काल झालेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे,बुद्धीष्ट वेलफेर सोसायटीचे कार्याध्यक्ष भगवान नितनवरे,सचिव विनायक वाघधरे,दौलतराव ढोके,संजय सत्यकार,किशोर बेलसरे,अश्वमेघ पाटील,शैलेश माटे,यांचा हस्ते महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण केली व अभिवादन करण्यात आले.

       आणि अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायु हो असे जयघोष करुन कालपासुन तीन दिवसिय कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

       या प्रसंगी पुंडलिक मानवटकर यांच्या हस्ते बुद्ध वंदना घेण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन अखिलेश मेश्राम व आभार प्रदर्शन रोहित मानवटकर यांनी केले.

       यावेळी प्रल्हाद कळमकर, चेतन मेश्राम,मनोज गोंडाने,नितिन मेश्राम,शैलेश दिवे,अखिलेश मेश्राम, महेंद्र चव्हान,अजय चव्हान,विजय धनविजय,नरेश चीमनकर,राजेश फुलझेले,संदीप शेंडे,आनंद चव्हान,महेश धोगड़े ,अश्विन भिवगडे, शरद मेश्राम,चिराल वैद्य,सुमेध नितनवरे,चिंटू यादव,दिवाळु,मेश्राम,नीलकंठ चव्हाण,कल्पना नितनवरे,पुलवंता उके,सुजाता नितनवरे,आदिंनी महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

      उपस्थितांना बुंदीचे वाटप करून अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.