काँग्रेस पक्षाने मातंग समाजाला उमेदवारी देऊन न्याय द्यावा :- मातंग समाजाची सागर कलानेसाठी मागणी…

युवराज डोंगरे /खल्लार 

            उपसंपादक

           दर्यापूर येथे मातंग समाजाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत मातंग समाजासाठी सागर कलाने यांना दर्यापूर विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी मातंग समाजातर्फे करण्यात आली. 

           दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मातंग समाज मोठया प्रमाणात आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जातीचा समावेश असून या जातीमध्ये मातंग समाजाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

          मातंग समाज हा काँग्रेस पक्षाचा पक्का मतदाता आहे परंतु काँग्रेस पक्षाने या समाजाचा राजकीय सामाजिक दृष्ट्या कधी विचार केला नाही या समाजाला जिल्हा परिषद सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद व लोकसभा इतर कुठेही काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही.

          अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा हा मतदार संघ अनुसूचित जाती करिता सन 2009 पासून आरक्षित आहे.सन 2019 मध्ये मातंग समाजाचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान युवा नेते सागर कलाने यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल म्हणून म्हणून फॉर्म भरला होता.

         परंतु काँग्रेस पक्षाने बळवंत वानखडे यांना तिकीट दिल्यामुळे मातंग समाजाचे उमेदवार सागर कलाने यांनी विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्याकरिता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार उमेदवारी फॉर्म मागे घेतला. 

            मागिल विधानसभा निवडणूकीत मातंग समाजाची मते बळवंत वानखडे यांना सागर कलाने यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला पडलीत मातंग समाजाला काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल नगरपरिषद विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा यावर कोणतेही सामाजिक संतुलन अबाधित ठेवण्याकरिता उमेदवारी न देऊन जबाबदारी पार पाडली नाही.

          काँग्रेस पक्षाने लोकशाही टिकवण्याकरिता व सामाजिक दायित्वाकरीता मातंग समाजाचा उमेदवार म्हणून सागर कलाने यांना दर्यापूर विधानसभेकरीता उमेदवारी द्यावी. अशी मागणी मातंग समाजाच्या बैठकित करण्यात आली.या बैठकीला सुरेश खंडारे यांच्यासह मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.